आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत दुसरे जॅग्वार एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त, लँडिंगवेळी रनवेवर 500 फूट घसरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमधील जामनगर एअरबेसवर एअरफोर्सचे जॅग्वार एअरक्राफ्टला दुर्घटना झाली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. विमान कोसळण्यापूर्वी पायलट सुरक्षित बाहेर पडला होता. चार दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे. याआधी 5 जून रोजी कच्छमध्ये जॅग्वार एअरक्राफ्ट कोसळले होते. या दुर्घटनेत एअर कमांडर रँकचे अधिकारी संजय चौहान यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे एअरफोर्सने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. 

 

एअरबेसवर 500 फूट घसरले एअरक्राफ्ट 
- हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले, की शुक्रवारी सकाळी 9.20 वाजता ही घटना घडली. लँडिंग पूर्वीच वैमानिकाला विमानातील गडबडीचा अंदाज आला होता. त्यामुळे एअर कमांडर रँकच्या अधिकाऱ्याने सर्वप्रथम स्वतः सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि जीव वाचवला. 
- सूत्रांची माहिती आहे की दुर्घटनेवेळी विमान रनवेवर 500 मीटर घसरत गेले. 

बातम्या आणखी आहेत...