आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दुर्घटना: अहमदाबादमध्ये ट्रक उलटला, 19 ठार; UPमध्ये ट्रॅक्टर दरीत कोसळले, 8 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी दोन वेगवेगेळे अपघात झाले. यात जवळपास 27 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद हायवेवर ट्रक उलटला, यात 9 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील संभल येथे एक ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली. या दुर्घटनेत 8 जणांना प्राण गमवावे लागले आहे. दोन्ही अपघातात 12 लोक जखमी आहेत. 

 

सीमेंटच्या गोण्या घेऊन निघाला होता ट्रक 
- गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील सरतानपर गावात झालेल्या ट्रक अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक सर्व मजूर आहे. ते आणंदला मजुरीसाठी निघाले होते. अपघाताचे कारण अद्याप कळालेले नाही. 
- मृतांमध्ये 8 ते 14 वर्षांची तीन मुले, 12 महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. 

 

कार्पेट विक्रीसाठी निघाले होते लोक 
- उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर दरीत कोसळले. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, राजपुर भागातील एका टी-पॉइंटवर ही दुर्घटना घडली. मुरादाबादकडून येणारे ट्रॅक्टर दरीत कोसळले, यात 8 जणांचा मृत्यू झाला. 
- अशी माहिती आहे, की ट्रॅक्टरमधून प्रवास करणारे लोक हे कार्पेट विक्रीसाठी निघाले होते. 

बातम्या आणखी आहेत...