आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • परेश रावल अडवाणींचे तिकीट कापणार BJP\'s National President Amit Shah Will Hold A Meeting With The Leaders On Monday

गुजरातबद्दल भाजपचे चिंतन: लाल कृष्ण अडवाणी, परेश रावलसह 13 जणांचे तिकीट कापणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अडवाणी गांधीनगर येथून खासदार आहेत. - Divya Marathi
अडवाणी गांधीनगर येथून खासदार आहेत.

गांधीनगर - भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गुजरात विधानसभेत काठावर विजय मिळाल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहांनी येथे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीचा आज (सोमवार) समारोप होत आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यासोबतच 2014 पासून आतापर्यंत चांगले प्रदर्शन न केलेल्या खासदारांना पर्याय शोधणे आणि असंतुष्टांची नाराजी दूर करणे यासंबंधी चिंतन आणि चर्चा होणार आहे. खासदार लाल कृष्ण अडवाणी आणि परेश रावल यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे.

 

सोमवारी अमित शहा बैठकीला उपस्थित राहाणार 
- सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने केलेल्या खासदारांच्या कामाच्या सर्व्हेमध्ये गुजरातमधील एकूण 26 खासदारांपैकी भाजपचे अर्धाडजन खासदारांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. या जागांवर राज्य कार्यकारिणी पर्यायी नावांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच असंतुष्ठांची मनधरणी करुन गड वाचवण्याचाही प्रयत्न होणार आहे. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा दिवसभर राज्याच्या नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. 

 

या खासदारांचा पत्ता कापला जाणार 
- अहमदाबाद पूर्व येथील खासदार आणि अभिनेता परेश रावल, अहमदाबाद पश्चिम येथील डॉ. किरीट सोलंकी, गांधीनगर येथील खासदार लाल कृष्ण अडवाणी, पाटण येथील लीलाधर वाघेला, सुरेंद्रनगर येथील देवजी फतेपूरा, भरूच येथील मनसुख वसावा, वलसाडचे के.सी.पटेल, अमरेकीलचे नारण काछडिया, कच्छ येथील विनोद चावडा, महेसाणा येथील जयश्रीबेन पटेल, सूरतच्या दर्शनाबेन जरदोष, साबरकांठा येथील दीपसिंह राठोड यांच्यासह खासदार विठ्ठल रादडिया आणि पंचमहाल येथील खासदार प्रभातसिंह चौहान यांना पर्याय शोधले जात आहेत. 

 

पुरुषोत्तम सोलंकी आणि बोखिरिया नाराज 
- सोलंकी यांना कॅबिनेटमध्ये स्थान हवे आहे. बोखिरिय यांचा मंत्रिमंडळातून पत्ता आधीच कापण्यात आला आहे. सी.के. राऊलजी आणि त्यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये येऊन आमदार झालेले नेतेही पक्षात उपेक्षा होत असल्याने नाराज आहेत. शंकर चौधरी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे पक्ष संघटनेत पुनरागमन झाले नाही. अशा असंतुष्ट नेत्यांची मनधरणी करुन भाजप गुजरातचा गड वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...