आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • कॉलगर्ल म्हणून व्हायरल केला जात आहे या अॅक्ट्रेसचा फोटो; 90 सी ग्रेड चित्रपटांत केले काम Bold Actress Sapna Sappu Profile Story From Vadodara

कॉलगर्ल म्हणून व्हायरल केला जात आहे या अॅक्ट्रेसचा फोटो; 90 सी ग्रेड चित्रपटांत केले काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा - नुकतेच सोशल मीडियावर अंडर गारमेंट दाखवणारा एक फोटो व्हायरल झाला आहे, यासोबत लिहिण्यात आले आहे की, Available in Delhi. याशिवाय या फोटोसोबत तिचा फोन नंबरही देण्यात आला आहे. वास्तविक हा फोटो सपना सप्पूचा आहे. तिने सी ग्रेडच्या तब्बल 90 चित्रपटांत काम केलेले आहे. 2012 मध्ये तिने बडोद्याचे बिल्डर राजेश गोयल यांच्याशी विवाह केला. मुले जन्माला आल्यानंतर दोघांतील नात्यात वितुष्ट आले. यानंतर सपना मुंबईला गेली. 

 

फोटोत सपनाला दाखवले कॉलगर्ल...

मुंबईतील रहिवासी सी-ग्रेड अॅक्ट्रेस सपना सप्पूला कॉलगर्ल असल्याचे दाखवणारा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. तिने एमएसएस कांड, सपना की जवानी, प्यासी भूत यासह तब्बल 90 चित्रपटांत काम केले आहे. सपना एक बोल्ड अॅक्ट्रेस असून चित्रपट निर्मातीही आहे. 1990 मध्ये आलेल्या गुंडा चित्रपटापासून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये बडोद्यातील मोठे बिल्डर राजेश गोयलशी लग्न केले.

 

मुलाच्या जन्मानंतर सुरू झाला गृहकलह
सपनाचे वैवाहिक आयुष्य जास्त दिवस टिकू शकले नाही. लग्नाच्या एका वर्षानेच दोघांत वाद होऊ लागले. यानंतर मुलगा जन्माला आल्यावर तर परिस्थिती हाताबाहेर गेली. एवढी की, सपना आपल्या दीड वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन मुंबईला गेली. आता 30 एप्रिल रोजी तिने आपल्या गुजरातेतील आणि महाराष्ट्रातील मित्रांना फोन केला, तेव्हा तिला कळले की, लाल जॅकेटमध्ये अंडर गारमेंट्समध्ये दिसणाऱ्या या फोटोसोबत लिहिले होते अव्हेलेबल इन दिल्ली. यापुढे लिहिले होते- 20 हजार आणि 50 हजार. एवढेच नाही, यावर कॉमेंट मिस्टर सोनू आणि मोबाइल नंबरही होता. याची तक्रार तिने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू असल्याचे म्हटले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अॅक्ट्रेस सपना सप्पूचे आणखी काही फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...