आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरबंदरमध्ये EVM ब्लूटूथशी कनेक्ट असल्याची तक्रार, EC च्या पथकाने फेटाळला दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरबंदरच्या ठक्कर प्लॉट पोलिंग स्टेशनवर EVM ब्लूटूथद्वारे कनेक्ट असल्याची तक्रार मिळाली होती. - प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
पोरबंदरच्या ठक्कर प्लॉट पोलिंग स्टेशनवर EVM ब्लूटूथद्वारे कनेक्ट असल्याची तक्रार मिळाली होती. - प्रतिकात्मक फोटो.

पोरबंदर - गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान शनिवारी पोरबंदरमध्ये ठक्कर प्लॉटच्या पोलिंग स्टेशनवर EVM ब्लूटूथशी कनेक्ट असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाचे पथक त्याठिकाणी पोहोचले. पण तपासानंतर निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला. आसपासचे दुसरे डिव्हाइस कनेक्ट असल्याचे ते प्रकरण होते. 


EC च्या टीमने केली EVM ची चौकशी 
- न्यूज एजन्सीच्या मते, EC च्या टेक्निकल टीमने तपासानंतर दावा केला की, ईव्हीएम ब्लूटूथशी कनेक्ट झालेले नाही. 
- ईसी टीममधील इंजिनीअर एस आनंद मीडियाशी बोलताना म्हणाले की, मोबाइलवर ब्लूटूथ ऑन केल्यानंतर आसपासच्या डिव्हाइसची नावे दिसतात. मोबाईलवर ईको 105 असे दिसत होते. तो इंटेक्स कंपनीच्या मोबाइलचा कोड होता. तुम्ही हे नाव बदलूही शकता. तुम्ही तुमचे नाव ठेवले तर तेच दिसते. 
- ईव्हीएमवर प्रश्नचिन्हं उपस्थि होताच, याच वर्षी सुप्रीम कोर्टाने आगामी सर्व निवडणुकांत वीवीपीएटीचा वापर करण्याचे आदेश दिले होते. 


केव्हा सुरू झाला EVM वरील वाद?
याचवर्षी 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले त्यानंतर EVM च्या वापरावर मायावती, हरीश रावत, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल अशा नेत्यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले. या राज्यांमधून यूपी आणि उत्तराखंडमद्ये भाजपला मोठे बहुमत मिळाले होते. विशेषतः केजरीवाल आणि मायावतीने युपीत वापरलेल्या EVM मध्ये मोठ्या प्रमाणावर गडबडी झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच निकाल भाजपच्या बाजुने आले होते. 


काय आहे VVPAT
मतदानावेळी मतदारांना फीडबॅक देण्याची ही एक पद्धत आहे. त्याअंतर्गत ईव्हीएमला प्रिंटरसारखे एक यंत्र लावले जाते. मत टाकल्यानंतर 10 सेकंदात त्यातून एक चिठ्ठी बाहेर येते त्यावर ज्याला मतदान केले त्याचा सिरियल नंबर, नाव आणि त्या कँडिडेटचे चिन्हं असते. ही चिठ्ठी मशीनमधून निघाल्यानंतर खाली असलेल्या एका बॉक्समध्ये पडते. 

 

बातम्या आणखी आहेत...