आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये रुपाणींचाच \'विजय\', भाजपच्या बैठकीत शिक्कामोर्तब, नितीन पटेल उपमुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमध्ये भाजप सहाव्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विजय रुपाणी यांच्या नावाचीच घोषणा करण्यात आली आहे. तर नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. पक्षाचे गुजरातसाठीचे निरीक्षक अरुण जेटली यांनी रुपाणी आणि पटेल यांच्या नावाची घोषणा केली. सर्व नवनिर्वाचित आमदारांनी बैठकीत सहभाग घेतला आणि सर्व संमतीने विधिमंडळ पक्षाने याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. 

 

रिव्हर फ्रंटवर शपथविधी होण्याची शक्यता 
गुजरातच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा रिव्हर फ्रंट किंवा सरदार पटेल स्टेडियममध्ये होऊ शकतो. यापूर्वी सरदार पटेल स्टेडियम आणि  गांधीनगरच्या महात्मा मंदिरात शपथविधी सोहळा झाला आहे. 25 डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी हा सोहळा होऊ शकतो. 


गुजरातमध्ये का केला नाही बदल.. 
1) दबावात आल्याचे किंवा झुकल्याचे संकेत द्यायचे नव्हते 

- गुजरातमध्ये 22 वर्षांमध्ये भाजपची कामगिरी सर्वात खराब राहिलेली आहे. आकडाही शंभरच्या खाली 99 वर पोहोचला. गेल्यावेळी मिळालेल्या जागांच्या तुलनेत हा आकडा 16 जागांनी कमी आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला 161 जागांवर आघाडी होती आणि 60 टक्के मते मिळाली होती. मते तीन वर्षांत 11 टक्क्यांनी घटली आहे. 
- जागांचा विचार करता  14 भाजपशासित राज्यांत गुजरात आठव्या स्थानी आहे. या निसटत्या विजयानंतर नेतृत्वात बदल करून दबावात आल्याचे संकेत देण्याची पक्षाची इच्छा नव्हती. भाजपने गुजरातमध्ये 54% जागा जिंकल्या आहेत. 


2) मोदींची स्ट्रॅटर्जी 
विश्वासार्ह लोकांकडेच नेतृत्व कायम ठेवायचे ही मोदींची स्ट्रॅटर्जी आहे. त्यामुळेच रुपाणी यांना कायम ठेवण्यात आले असून पुरुषोत्तम रूपाला किंवा स्मृती ईराणी यांना सत्ता सोपवण्यात आलेली नाही. 

 

3) 2019 वर नजरा 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातच्या सर्व 26 जागा जिंकल्या होत्या. आता 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीला दीड वर्षांचा वेळ शिल्लक आहे. त्याआधी गुजरातमध्ये टीम बदलण्याची भाजपची इच्छा नाही. 
- यापूर्वी भाजपच्या सुत्रांनी आमची गुजराती भाषेतील बेवसाईट दिव्य भास्करलाही माहिती दिली होती की, रूपाणी आणि पटेल यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत कायम ठेवण्याची सक्यता आहे. त्यामागचे कारण म्हणजे, रूपाणी आणि पटेल हे पक्षातील असे चेहरे आहेत ज्यांना शक्यतो विरोध होत नाही. 

 

रुपाणींच्या नावावर शिक्कामोर्तब

आनंदीबेन पटेल यांना हटवल्यानंतर विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते राजकोट पश्चिम मधून निवडून आले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे ते नीकटवर्तीय आहेत. पक्षसंघटनेवर त्यांची पकड चांगली आहे. त्यामुळेच त्यांच्यानावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला गेल्या 22 वर्षांत सर्वात कमी जागा मिळाल्या, हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता होती पण तसे झाले नाही. 

 

पुढे वाचा, मुख्यमंत्रीपदासाठी आणखी कोण होते दावेदार..

बातम्या आणखी आहेत...