आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सूरत - हिरे व्यापारी दीपेश शहा यांचा 12 वर्षांचा मुलगा 19 एप्रिल रोजी जैन मुनी म्हणून दीक्षा घेणार आहे. भव्य शहा हा इम्पोर्टेड कार, बाइक, उंची परफ्यूम, गॉगल्सचा शौकीन आहे. आता त्याने संयम आणि त्यागाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार केला आहे. गेल्यावर्षी 16 ऑक्टोबरला त्याची मुहूर्त यात्रा फरारी कारमधून काढण्यात आली होती.
अशी मिळाली दीक्षा घेण्याची अनुमती...
- भव्य शहाचे कुटुंब सूरतमधील सरगम शॉपिंग सेंटर येथील सागर अपार्टमेंटमध्ये राहाते.
- सहाव्या वर्गात 79 टक्के गुण मिळवणारा भव्य सुट्यांमध्ये मुनींसोबत राहाण्याला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याला पसंती देऊ लागला. यानंतर त्याने शिक्षणही सोडून दिले.
- आतापर्यंत भव्यने बडोदा, अहमदाबाद, राजकोट, राजस्थानमध्ये 1000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे.
- जैन मुनी होण्यापूर्वी त्याने स्वतःवर संयम मिळवला. सायंकाळ होण्यापूर्वीच जेवण आणि त्यागाची भावना आत्मसात केली, यामुळे त्याला दीक्षा घेण्याची अनुमती मिळाली.
बहीणीने 12व्या वर्षी घेतली दिक्षा
- भव्यची आई पिकाबेन शहा यांनी सांगितले की मोठा मुलगा इंद्र सध्या शिक्षण घेत आहे.
- मुलगी प्रियांश हिने 4 वर्षांपूर्वी 12व्या वर्षी दीक्षा घेतली होती.
- बहीणीची दीक्षा आणि घरातील वातावरण यामुळे भव्यच्या मनता वैराग्याच्या भावना जागृत झाल्या.
- आम्ही त्याला 2 वर्षे थांबण्यास सांगितले मात्र त्याने बहीणीच्या वयातच दीक्षा घेण्याचे पक्के केले होते.
भव्यसमोर भव्यता निष्प्रभ
- महागड्या लक्झरी कार, गॉगल्स, उंची वस्त्र आणि परफ्यूम यांचा शौकिन असलेल्या भव्यच्या मनात वैराग्याने वास केला आणि या सर्व गोष्टींचा त्याने त्याग केला. त्याने 1000 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केला आहे.
दर्शन
- भव्यने म्हटले आहे की सर्वकाही असताना लोक खोटे बोलतात मग शांती कशी लाभेल? म्हणजेच सुविधाच या सर्वकाही नाहीत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भव्यचे फोटो आणि फॅमिली...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.