आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या गावातील सर्व श्वान आहेत करोडपती Every Dog In This Gujarat Village Is Millionaire

भारताच्या या गावातील प्रत्येक श्वान आहे करोडपती, प्रत्येकाच्या खात्यात आहेत 1 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहसाना - गुजरातेत एक असेही गाव आहे, जे प्राणिमात्रांच्या सेवेसाठी ओळखले जाते. एवढेच नाही, या गावातील जवळजवळ प्रत्येक श्वान 1 कोटी रुपयांचा मालक आहे. आम्ही सांगत आहोत मेहसाना जिल्ह्यातील पंचोत गावाबद्दल.. येथे जमिनीची रखवालीने श्वानांची वार्षिक कमाई कोट्यवधींमध्ये होत आहे. वास्तविक, मागच्या दशकभरात राधनपूरकडे मेहसाना बायपास बनल्यामुळे जमिनीच्या किमती वेगाने वाढत आहेत. ज्याचा सर्वात जास्त फायदा या गावातील श्वानांना होत आहे. 

 

श्वानांसाठी बनले आहे रोटला घर...
- पंचोट गावात 'Madh ni Pati Kutariya' नावाची एक ट्रस्ट आहे. यांच्याकडे 21 बीघे जमीन आहे. बायपासलगत असलेल्या जमिनीची किंमत तब्बल 3.5 कोटी रुपये प्रति बिघा आहे.
- ही जमीन भलेही श्वानांच्या नावावर नाही, परंतु यातून होणाऱ्या उत्पन्नाचा एक भाग श्वानांच्या नावावरही वेगळा ठेवला जातो.
- एका मीडिया रिपोर्टनुसार, या ट्रस्टकडे 70 श्वान आहेत. आणि प्रत्येक श्वान 1 कोटी रुपयांचा मालक आहे.

 

इतिहास
- ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल म्हणाले की, गावात प्राण्यांसाठी प्रेमभावाचा इतिहासा मोठा आहे. त्यांच्या मते, 'Madh ni Pati Kutariya' ट्रस्टची सुरुवात श्रीमंतांकडून जमिनीचे तुकडे दान करण्याच्या परंपरेने झाली. 
- 'तेव्हा जमिनीच्या किमती एवढ्या जास्त नव्हत्या. तथापि, काही प्रकरणांत टॅक्स न देऊ शकल्याच्या स्थितीमध्ये लोक आपली जमीन दान करत होते.'
- छगनलाल म्हणाले की, 70-80 वर्षांपूर्वी पटेल शेतकऱ्यांच्या एका समूहाने जमिनीची देखभा सुरू केली. परंतु रेकॉर्डमध्ये आताही जमीन मूळ मालकांच्याच नावे आहे.
- तथापि, एकानेही आतापर्यंत जमिनीवर क्लेम केलेला नाही. येथील लोकांचे मानणे आहे की, प्राण्यांसाठी वा सामाजिक कार्यासाठी दानात दिलेली जमीन परत घेणे वाईट असते.
- पेरणीआधी दरवर्षी ट्रस्ट आपल्या हिश्शातील एका प्लॉटचा लिलाव करते. ज्याची बोली जास्त असते, त्याला वर्षभर त्या जमिनीच्या तुकड्यावर पीकपाणी घेण्याचा हक्क दिला जातो.
- यातून मिळणारी रक्कम श्वानांच्या सेवेमध्ये खर्च केली जाते.

 

श्वानांच्या सेवेसाठी बनवले रोटला घर
- गावाच्या सरपंच कांताबेन यांचे पती दशरथ पटेल म्हणाले, 'मला आठवते की, 60 वर्षांपूर्वी श्वानांसाठी सेवाघर बनवण्याच्या पुढाकारामध्ये मीही सामील होतो.'
- 'तेव्हा 15 जणांना पैसे न घेता श्वानांच्या अन्नासाइी रोटला बनवण्याची जबाबदारी घेतली होती. एवढेच काय, गिरणीवाल्यानेही दळणासाठी एक रुपयाही घेतला नव्हता.'
- 2015 मध्ये ट्रस्टने 'रोटला घर' बनवले. येथे दोन महिला रोटला (श्वानांच्या खाण्यासाठी बनवला जाणारा चपातीसारखा पदार्थ) बनवण्याचे काम करतात.
- येथे दररोज 20-30 किलो पिठापासून 80 रोटला तयार केल्या जातात. मग संध्याकाळी 7.30 वाजेपासून 11 वेगवेगळ्या जागांवर भटक्या कुत्र्यांमध्ये याचे वितरण केले जाते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...