आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेत क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहच्या आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे आजोबा संतोखसिंह बुमराह (८४)यांचा मृतदेह रविवारी साबरमती नदीजवळ सापडला. त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 


गेल्या दोन दिवसापासून ते बेपत्ता होते. संतोखसिंग हे उत्तराखंडातील उधमसिंग नगरच्या किच्छा येथील रहिवासी होते. ते तीन - चार दिवसांपूर्वी ते जसप्रीतला भेटण्यासाठी आले होते. अहमदाबादेत त्यांची मुलगी राहते. ते त्यांची मुलगी रविंदर कौर यांच्याकडे थांबले होते. जसप्रीतची आई व आजोबामध्ये वाद सुरू होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदर कौर यांनी  ८ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात संतोखसिंग हरवल्याची तक्रार दिली होती. दुपारी दीड वाजेपासून संतोखसिंग घरातून बाहेर पडले. ते अद्यापपर्यंत परतले नाहीत. त्यांचा फोन लागत नाही. नातेवाइकांकडे व इतर मित्रमंडळीकडे चौकशी केली पण तेथेही त्यांचा ठावठिकाणा आढळला नाही, असे तक्रारीत म्हटले होते. 


शनिवारी येथील साबरमती नदीच्या काठावर संतोखसिंग यांचा मृतदेह आढळला. जसप्रीत बुमराह  हा तरुण क्रिकेटपटू असून तो हिमाचल प्रदेशातील धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या भारत -श्रीलंका एक दिवसीय सामन्यात खेळत होता. त्यामुळे जसप्रीत सध्या अहमदाबादेत नाही.


ट्रक व्यावसायिक असलेले संतोखसिंग यांचे अहमदाबादेत तीन कारखाने होते. २००१ मध्ये त्यांचा मुलगा व जसप्रीतचे वडि जसवीरसिंग यांचा काविळीमुळे मृत्यू झाला. 


अार्थिक परिस्थिती अडचणींची झाल्याने  आजोबांना तिन्ही कारखाने विकावे लागले. त्यानंतर ते उत्तराखंडात गेले. तेथे संतोखसिंग यांनी वाहतूक व्यवसाय सुरू केला. एक ट्रक स्वत: चालवत असत. ज्या मुलासोबत ते राहात होते, तोही दिव्यांग आहे. त्याच्याही पत्नीचे २०१० मध्ये निधन झाले होतेे.

 

जसप्रीतला भेटण्याची अंतिम इच्छा
संतोखसिंग यांचा  एक व्हिडिओ व्हायरल झाला असून क्रिकेटपटू जसप्रीत यास भेटण्याची शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जसप्रीतची आई मला जसप्रीतला भेटू देत नाही, असा त्यांचा आरोप होता.

 


वडिलांच्या निधनानंतर नव्हता संपर्क 
- 84 वर्षीय संतोख सिंग हे उत्तराखंडच्या उधमसिंग नगर येथील विकास कॉलनीत भाड्याच्या घरात राहतात.
- 2001 मध्ये कावीळ झाल्याने बुमराहच्या वडिलांचे निधन झाले होते. 
- वडिलांच्या मृत्यूनंतर जसप्रित बुमराह आणि त्याची आई काही कारणास्तव कुटुंबापासून वेगळे झाले होते. ते पुन्हा कधीही त्यांना भेटले नाहीत.  

 

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS 

बातम्या आणखी आहेत...