आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 2 बहिणींनी गुजरात निवडणुकीत केले शेवटचे मतदान; यानंतर करणार नाहीत, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - शहराच्या रांदेर परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींनी आपल्या जीवनातील अखेरचे मतदान केले. कारण 3 महिन्यांनी त्या जैन धर्माची दीक्षा घेणार आहेत. दोन्ही बहिणी ढोल-ताशांच्या गजरात मतदान केंद्रावर पोहोचल्या. दोन्ही बहिणींनी सर्वांना आवाहन केले की, मतदान आपला हक्क आहे. सर्वांना आवर्जून मतदान केले पाहिजे.

 

18 मार्च रोजी घेणार दीक्षा...
- 22 वर्षीय दोषी सिमोनी आणि 24 वर्षीय दोशी सोनिका आज मतदान करण्यासाठी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यास ढोल-ताशांचे पथकही होते. त्या दोघीही 18 मार्च रोजी दीक्षा घेणार आहेत. यासंबंधी जैन समाजाचे अजित मेहता म्हणाले की, जैन धर्मात जो दीक्षा घेतो, तो मतदान करत नाही. मग त्या साध्वी असो वा महाराज साहेब. या दोन्ही बहिणीही दीक्षेनंतर मतदान करणार नाहीत, कारण त्यांचा संबंध थेट ईश्वराशी असेल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, यासंबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...