आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात नगरपालिका निवडणूक निकाल: 43 पालिकांमध्ये BJP आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद (गुजरात) - गुजरातमध्ये 74 नगरपालिका निवडणुकींची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीचा कल हा भाजपच्या बाजून आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. डिसेंबर 2017 मध्ये येथे विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी 17 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. नगरपालिका निवडणुकीत भाजपेच 1934 तर काँग्रसकडून 1783 उमेदवार मैदानात होते. तर 1793 उमेदवार अपक्ष निवडणुक लढवत होते. 

 

किती नगरपालिका भाजपच्या ताब्यात...
- 74 नगर पालिकांपैकी 43 मध्ये भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस 27 जागांवर पुढे आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
- मागील निवडणुकीत 74 पैकी 60 नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला होता. 

 

17 फेब्रुवारीला झाले मतदान 
- गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर 17 फेब्रुवारीला 74 नगरपालिकांसाठी मतदान झाले. त्यासोबत 2 जिल्हा परिषद, 17 पंचायत समिती आणि जवळपास 1400 ग्राम पंचायतींसाठी मतदान झाले. 
- दाहोद येथे सर्वाधिक मतदान झाले. 76.67% आणि राजकोट येथे सर्वात कमी 50.17% मतदान झाले.

बातम्या आणखी आहेत...