आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Politics: काँग्रेस आमदाराने सकाळी दिला राजीनामा, संध्याकाळी बनले भाजप सरकारचे मंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - मंगळवारी गुजरातेत वेगवान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. विजय रूपाणी सरकारमध्ये कुंवरजी बावलिया यांच्या रूपाने एक नवे कॅबिनेट मंत्री आले आहेत. राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी राजभवनात संध्याकाळी 4 वाजता त्यांना शपथ दिली. राजकोट जिल्ह्यातील जसदण विधानसभा (सौराष्ट्र) मधून काँग्रेसचे आमदार कुंवरजी बावलिया यांनी मंगळवारी सकाळीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

- वास्तविक, कोळी समाजाचे दिग्गज नेते बावलिया पक्षावर नाराज होते. यापूर्वी राजकोटमधून आणखी एक नेते आणि माजी आमदार इंद्रनील राजगुरू यांनीही पक्षनेतृत्वावर व अनेक वरिष्ठ नेत्यांवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून राजीनामा दिला होता. बावलिया हे काँग्रेसकडून 6 वेळा निवडून आलेले आहेत. 2009 मध्ये राजकोटमध्ये लोकसभेची निवडणूकही त्यांनी जिंकली होती.    

बातम्या आणखी आहेत...