आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतराला अनुकूल ठरेल जनमताचा कल! पहिल्या टप्प्यातील मतदानाचा संकेतार्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीत सरासरी ६८ टक्के मतदान झाले. ते अजून ३-४ टक्के वाढू शकते. २०१२ मध्ये ७१ टक्के मतदान झाले हाेते. या वेळी त्यात विलक्षण वाढ होईल अशी शक्यता नाही. एकंदरीत हे मतदान विशेष संकेत जरूर देत अाहे. जेव्हा एखादी लाट असते त्या वेळी अधिक मतदान नाेंदवले जाते. ती लाट सत्तेच्या विराेधात किंवा अनुकूल असू शकते. कारण अधिक प्रमाणात झालेले मतदान हे साधारणपणे उत्साह किंवा लाेकक्षाेभाचे प्रतीक मानले जाते. केवळ या दाेन कारणांमुळे लाेक मतदानाकडे अाकर्षित हाेतात. काही जागा वगळल्या तर राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानातून काही लाट अशी दिसली नाही. 


तर याचा अर्थ काय?

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप अाणि काँग्रेस दाेन्ही पक्ष अापल्या विजयाचा दावा करीत अाहेत. अर्थातच करायलादेखील हवा. जे अाकडे अाणि अहवाल अाले अाहेत त्यानुसार सुरतमध्ये ७० टक्के मतदान झाले. उल्लेखनीय म्हणजे सुरत हा सर्वाधिक ‘जीएसटी’ प्रभावित जिल्हा अाहे. गेल्या निवडणुकीत येथे जवळपास इतकेच मतदान झाले हाेते. अर्थात त्या वेळी जीएसटीचा प्रभाव नव्हता. अाता दुसरा मुद्दा पाटीदार अांदाेलनाचा हाेता. पटेल फॅक्टर माेरबी अाणि राजकाेट-सुरतमधील काही जागांशिवाय अन्य ठिकाणी कमजाेर दिसला. माेरबी-टंकारामध्ये जरूर निर्णायक भूमिकेत पाहायला मिळेल. 

कमी मतदान का झाले? 

> पहिल्यांदाच १८-३५ वर्षे वयाेगटातील युवकांची संख्या ४० पेक्षा अधिक वय असलेल्यांच्या तुलनेत अधिक अाहे. युवावर्ग विद्राेह, विराेध अाणि विकास या मुद्द्याशी सर्वाधिक जाेडलेला असताे. तसेच सर्वाधिक अाशा त्यांनाच असते. परंतु जातीय संघर्षाची धग त्यांनी पाहिली अाहे.  

 

> विकासाच्या मुद्द्यांवरून धर्म अाणि अस्मितेकडे प्रचार भरकटलेला पाहायला मिळाला. युवकांच्या भविष्याचा वेध घेण्यापेक्षाही भाजप-काँग्रेसने भूतकाळातले मुद्दे चर्चेच अाणले. त्यामुळे खरा प्रचार, खरे मुद्दे बाजूलाच राहिले.

 

> अजूनही दुसऱ्या टप्प्यातील मतदान १४ डिसेंबरला हाेत अाहे. गुजरातचा एक भाग ७० टक्क्यांपर्यंत पाेहोचू शकताे, तर दुसरा भाग जरूर त्यापेक्षाही अधिक मतदान करू शकेल. कारण अशी संधी तब्बल ५ वर्षांनंतरच येणार अाहे.

 

> सुरुवातीला जीएसटी, नाेटबंदीचा विषय चर्चेत हाेता. रस्ते, वीज, पाणी, नाेकरी, अाराेग्य, शिक्षणाविषयी अाश्वासने दिली जात हाेती. पटेल अारक्षणाच्या बाजूने तसेच विराेधात बाजू मांडली जात हाेती. परंतु अचानक मंदिर दर्शन, जानव्यावरून राजकारण सुरू झाले. स्वत:ला खरा दुसऱ्याला खाेटा हिंदू ठरवण्याची जणू स्पर्धा सुरू झाली हाेती. परिणामी विकासाच्या मुद्द्याकडे मतदारांचे लक्ष वळवण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरले. कदाचित विकासाच्या मुद्द्यावरील उत्तरांपासून स्वत:चा बचाव करण्याचा भाजपचा प्रयत्नही असेल? 

बातम्या आणखी आहेत...