आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता गुजरात विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले, आंबेडकर आणि मोदीही ब्राह्मण तर कृष्ण OBC

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येऊ नये म्हणून पक्षाच्या नेत्यांना काही सूचना केल्या होत्या. मात्र भाजप नेत्यांना त्या सूचना समजल्याच नाहीत असे दिसतेय. त्याचे कारण म्हणजे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यात आता गुजरात विधानसभा अध्यक्षांनी कळस केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ब्राह्मणांची स्तुती करताना आंबेडकर आणि मोदी हेदेखिल ब्राह्मण आहेत, असे वक्तव्य करून टाकले. 


गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी 'मेगा ब्राह्मण बिझनेस समिट' या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले आहे. बीआर आंबेडकरांना ब्राह्मण म्हणण्यात मला काहीही अडचण नाही. शिकलेल्या-हुशार लोकांना ब्राह्मण म्हणण्यात काही चुकीचे नाही. यासंदर्भात मी तर म्हणेन की पंतप्रधान मोदीही ब्राह्मण आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य त्रिवेदी यांनी केले आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. देवांनाही त्यांनी सोडले नाही, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनाही देवत्व ब्राह्मणांमुले लाभले असे त्रिवेदी म्हणाले.


राम क्षत्रिय तर कृष्ण ओबीसी
कार्यक्रमात ब्राह्माणांची स्तुती करताना राजेंद्र त्रिवेदी एवढे वाहावत गेले की, त्यांनी थेट देवांचेच जाती-धर्म काढले. त्रिवेदी म्हणाले की, तसे पाहिले तर श्री राम हे क्षत्रिय होते, पण त्यांनी ऋषी मुनींनी देव बनवले. त्यानंतर त्रिवेदींनी मोर्चा वळवला तो श्रीकृष्णाकडे. गोकुळमधील गवळी (श्रीकृष्ण) आपल्याकडे त्यांना ओबीसी म्हणतात, मग या ओबीसीला श्रीकृष्ण कोणी बनवले.. सांदिपनी ऋषींनी त्यांना देव बनवले, असे त्रिवेदी म्हणाले. 


पुढे वाचा, बिप्लब देब म्हणाले,  सरकारी नोकरीच्या मागे पळण्याऐवजी पाटटपरी सुरू करा...

बातम्या आणखी आहेत...