आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवीण तोगडियांची हार्दिक पटेल-वंजारांनी घेतली भेट, पाटीदार नेत्याने केले वादग्रस्त वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी मंगळवारी तोगडियांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. - Divya Marathi
पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी मंगळवारी तोगडियांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.

अहमदाबाद - सोमवारी गायब झालेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मंगळवारी सकाळी मीडियासमोर आले. 11 गायब झालेले तोगडिया सोमवारी सायंकाळी बेशुद्धावस्थेत एका पार्कमध्ये सापडले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मंगळावारी पत्रकार परिषदेत त्यांनी माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गौप्यस्फोट केला. तोगडिया म्हणाले मी घाबरलेलो नाही, मात्र मला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्या घराचे सर्चवॉरंट काढण्यात आले आहे. 

 

तोगडियांच्या भेटीसाठी गेला हार्दिक पटेल 
- तोडिगायांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही वेळाने गुजरातचे माजी डीजीपी डी.जी.वंजारा यांनी प्रवीण तोगडीया यांची भेट घेतली. त्यासोबतच पाटीदार नेता हार्दिक पटेलही तोगडियांच्या भेटीसाठी गेला. तोगडियांची भेट घेऊन बाहेर आलेले हार्दिक पटेल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे दोघे प्रवीण तोगडियांविरोधात षडयंत्र रचत आहेत. 


हार्दिक पटेल म्हणाले, ते तोगडिया आणि आम्ही शेतकाऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत असल्यामुळे आमच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनीही तोगडियांची भेट घेतली. 

 

व्हीएचपी नेते प्रवीण तोगडियांनी पत्रकार परिषदेत सांगितले की काही दिवसांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मी हिंदू एकतेसाठी प्रयत्न करत आहे. कित्येक वर्षांपासून हिंदूंचा आवाज सराकरपर्यंत पोहोचवत आहे. राम मंदिर, गोहत्या संबंधी कायद्याची मागणी करत आहे. हे करत असताना 10 वर्षे जुन्या खटल्यात माझे अटक वॉरंट काढण्यात आले. हे सांगत असताना तोगडिया भावूक झाले होते. त्यांना रडू कोसळले. 
तोगडियांनी सांगितले की ते स्वतः कोर्टापुढे समर्पण करतील.  

बातम्या आणखी आहेत...