शेवटचा सेल्फी..गुजरामधील पंचमहलमध्ये / शेवटचा सेल्फी..गुजरामधील पंचमहलमध्ये कार नाल्यात कोसळली; एकाच कुटुंबातील 7 मुलांचा मृत्यू

गुजरातमधील पंचमहलध्ये एक कार नाल्यात कोसळून एकाच कुटुंबातील सात मुलांचा मृत्यू झाला.

दिव्य मराठी वेब टीम

Aug 13,2018 03:20:00 PM IST

अहमदाबाद- गुजरातमधील पंचमहलध्ये एक कार नाल्यात कोसळून एकाच कुटुंबातील सात मुलांचा मृत्यू झाला. तिघांचा वाचवण्‍यात बचाव पथकाला यश आल्याचे पंचमहलचे पोलिस नि‍रीक्षक एबी देवधा यांनी दिली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.

मिळालेली माहिती अशी की, हलोल-बोदिली मार्गावर वळणावर कारचे मागील चाक निखळले. कार अनियंत्रित होऊन थेट शेजारी असलेल्या नाल्यात कोसळली. अपघात झाला तेव्हा कारमध्ये 10 जण होते. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. ‍स्थानिक लोकांना तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये मुलांचा समावेश असून ते बदोली येथील एकाच कुटुंबातील आहेत. जखमींना उपचारासाठी जम्बूघोडा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

मोहम्मद बिलाल (17), मोहम्मद राउफ (14), मोहम्मद साजिद(13), गुल अफरोज (13), मोहम्मद ताहिर आणि मोहम्मद यूसुफ (7) अशी मृतांची नावे आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ...

X
COMMENT