आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 68%मतदान, 2012 पेक्षा 3 टक्के कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदानासाठी आलेली वागदत्त वधू. - Divya Marathi
मतदानासाठी आलेली वागदत्त वधू.

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी १९ जिल्ह्यांतील ८९ जागांवर सुमारे ६८% मतदान झाले. २०१२ मधील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी ३% मतदान घटले. गेल्या निवडणुकीत या ८९ जागांपैकी ६३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसला २२ व इतरांना ४ जागा मिळाल्या होत्या.


निवडणूक आयोगानुसार शनिवारीचे आकडे संध्याकाळी ५ वाजेपर्यंतचे आहेत. अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. २०१२ मध्ये पहिल्या टप्प्यात १९ पैकी १५ जिल्ह्यांत निवडणूक होती. त्यात ७२.३७% मतदान झाले होते. यावेळी ४ नव्या जिल्ह्यांत मतदान झाले. दुसरीकडे, गुजरातेत २०१२ िवधानसभा निवडणुकीत १८२ जागांवर एकूण ७१.३०% मतदान झाले होते. या वेळी सर्वाधिक ७५% मतदान नवसारी व मोरबी जिल्ह्यात झाले.

 

गुजरातमध्ये एकूण जागा: 182
पहिल्या टप्प्यात मतदान: 89 जागांवर
उमेदवार: 977 (57 महिला)
ठिकाणे: 14,155
पोलिंग बूथ: 24,689

 

पहिल्या टप्प्यात कास्ट फॅक्टर?
- 89 जागांपैकी 24 जागांवर पाटीदार V/S पाटीदार असा मुकाबला असेल. 18 जागांवर ओबीसी V/S ओबीसी असा मुकाबला.
- भाजपने 31 पाटीदार, 21 ओबीसी, 15 सवर्ण, 14 आदिवासी, 8 दलित उमेदवार उतरवले आहेत.
- पहिल्या टप्प्यात 89 जागांपैकी 32 वर भाजप दोन टर्म वा जास्तने जिंकलेली आहे. भाजपने अशा जागांवर उमेदवार बदललेले आहेत.
- दुसरीकडे, काँग्रेसने 27 पाटीदार, 27 ओबीसी, 09 सवर्ण, 14 आदिवासी, 12 दलित-मुस्लिम उमेदवार उतरवले आहेत.


या 19 जिल्ह्यांत होणार मतदान
- पहिल्या टप्प्यात दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राच्या 19 जिल्ह्यांत 89 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान होत आहे.
- हे अाहेत 19 जिल्हे: कच्छ, सुरेंद्रनगर, मोरबी, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ़, गिर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोटाड, नर्मदा, भरूच, सुरत, तापी, डांग, नवसारी, वलसाड.


हे निवडणार पुढचे सरकार
पहिल्या टप्प्यात एकूण मतदार: 2 कोटी 12 लाख 31 हजार 652
पुरुष: 1 कोटी 11 लाख 5 हजार 933
महिला: 1 कोटी 1 लाख 25 हजार 472

 

पहिल्या टप्प्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर झाला प्रचार?
- विकास, शेतकरी, बेरोजगारी, घोटाळा, जीएसटी, नोटबंदी, राम मंदिर, आरक्षण, जातिवाद अशा मुद्द्यांवर आधी प्रचार झाला. परंतु नंतर याचे रूपांतर वैयक्तिक चिखलफेकीत झाले.

 

राहुल-मोदींनी कसा केला प्रचार?
1) मंदिर

राहुल: 3 महिन्यांत 24 मंदिरांत गेले.
मोदी: 2 महिन्यांत 4 मंदिरांत गेले.
- राज्याच्या 80 ते 100 विधानसभा मतदारसंघ असे आहेत, ज्यांवर या मंदिरांचा परिणाम पाहायला मिळतो.


2) सभा
मोदी आणि राहुल दोघांनीही पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी 15-15 हून जास्त सभा केल्या.


3) प्रवास
- मोदींनी सभांसाठी तब्बल 21,400 किमीचा प्रवास केला.
- राहुल यांनी नवसृजन यात्रा आणि सभांसाठी तब्बल 13,100 किमीचा प्रवास केला.

 

काय आहे या निवडणुकीचे महत्त्व?
- आगामी 2019 निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
- गुजरातमध्ये 19 भाजप सत्तेत आहे. 15 वर्षांत पहिल्यांदा मोदी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नाहीत.
- मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहाही केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले. परंतु या वर्षी राज्यसभेसाठी निवडले गेले.
- हार्दिक पटेलने पाटीदार आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या 12% लोकसंख्येवर प्रभाव टाकलेला आहे. आता हार्दिक यांचे काँग्रेसला समर्थन आहे.
- राहुल गांधीही या निवडणुकीत खूप सक्रिय आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीआधी 11 डिसेंबरला पक्षाच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड होणे निश्चित आहे.

 

हे ही वाचा,

गुजरात निवडणूक: मोदींनी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 19 सभा घेतल्या, उत्तर प्रदेशपेक्षा 6 पट जास्त सभा

निवडणूक लढवणाऱ्या मंत्र्यांची एकूण संपत्ती 200 काेटी, 5 वर्षांत १ लाख ते 13 काेटींची वाढ...

सोनिया, राहुलनी मला रावण, भस्मासुर संबोधले- मोदी; दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात...

गुजरात : भाजपने जारी केले 'संकल्प पत्र', काँग्रेस सामाजिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप

मोदींनी केला मनसुख यांचा उल्लेख, म्हणाले-अभिनंदन त्यांनी मनमोहन यांना सत्य सांगितले...

बातम्या आणखी आहेत...