आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Live: गुजरात विधानसभा निवडणूक Exit Poll 2017, Gujarat Election 2017 Exit Poll

गुजरातमध्ये 22 वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप सहाव्यांदा येईल सत्तेत, एक्झिट पोलचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातमध्ये गुरुवारी मतदान संपताच एक्झिट पोलचे निकाल आले. गुजरात व हिमाचल दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार येईल अशी स्थिती आहे. पाहणीच्या सरासरीनुसार भाजपला ११५ व काँग्रेसला ६६, तर हिमाचलमध्ये भाजप-४७ व काँग्रेसला २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. असे झाले तर गुजरातमध्ये २२ वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप सहाव्यांदा सत्तेत येईल, तर हिमाचलमध्ये सातव्यांदा आलटून-पालटून सरकार स्थापन करण्याची परंपरा कायम राहील.

 

> २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर १८ राज्यांत निवडणूक झाली. यात सर्वात कमी मतदान झालेले गुजरात सातव्या क्रमांकाचे राज्य ठरले. येथे ६७.७५% मतदान झाले. 

> 93 जागांमध्ये मोदींच्या वडनगर मतदारसंघाबरोबरच उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मेहसाणा आणि अल्पेश ठाकूर यांचा वाव मतदारसंघाचाही समावेश आहे.

> 2012च्या निवडणुकीत भाजपला 93 पैकी 52 आणि काँग्रेसला 39 जागांवर विजय मिळाला होता. येथे मागच्या वेळेपासून पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आंदोलन आणि रॅली करत आहेत.

> 93 पैकी 33 जागा ओबीसी आणि 15 जागा पाटीदार बहुल आहेत. दोन्हींनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात 66.75 टक्के मतदान झाले होते, जे मागच्या वेळेपेक्षा 4 टक्क्यांनी कमी आहे.

 

गुजरात निवडणुकीचे एक्झिट पोल अपडेट्स

1) ABP न्यूज-CSDS

विभाग एकूण मतदारसंघ भाजप काँग्रेस इतर
सौराष्ट्र-कच्छ 54 34 19 1
दक्षिण गुजरात 35 24 11 0

 

2) NEWS 24-चाणक्य

राज्य एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
गुजरात 182 135 47

00

 

3) टाइम्स नाऊ-VMR

राज्य एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
गुजरात 182 109 70 3

 

4) रिपब्लिक-सी व्होटर

राज्य एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
गुजरात 182 108 74

00

 

5) इंडिया न्यूज-CNX

राज्य एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
गुजरात 182 110-120 65-75

2-4

 

6) इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडिया

राज्य एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
गुजरात 182 99-113 68-82

1-4

 

7) झी न्यूज- अॅक्सिस

राज्य एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
गुजरात 182 99-113 68-82

1

 

19 वर्षांपासून गुजरातेत भाजपचे सरकार

- राज्यात सातत्याने 19 वर्षांपासून भाजपच सत्तेत आहे. 2014 पर्यंत मोदी मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर आनंदीबेन मुख्यमंत्री बनल्या. आता विजय रूपाणी मुख्यमंत्री आहेत.

- येथे यापूर्वी काँग्रेसचे सरकार 1995 मध्ये बनले होते.

 

2012 विधानसभा आणि 2014 च्या लोकसभेत काय होती स्थिती?

 

2012 विधानसभा

व्हाेट शेअर

2014 लोकसभा (एकूण जागा 26)

व्होट शेअर

विधानसभा जागांमधील वाढ

भाजप 115 47.9% 26 60.1% 162
काँग्रेस 61 38.9% 00 33.5% 17

 

 

> हेही वाचा

गुजरात निवडणूक: दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान संपले; मोदी, शहा आणि अडवाणी यांनी केले मतदान

बातम्या आणखी आहेत...