आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल म्हणाले, मोदींना दहा प्रश्न विचारले पण उत्तर नाही मिळाले, आता \'भाषण ही शासन\'!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना एकापाठोपाठ एक असे दहा प्रश्न विचारले आङेत. शनिवारी या प्रश्नांबाबत मोदींना राहुल यांनी ट्विटरवर विचारणा केली. राहुल यांनी ट्वीटमध्ये लिहिले, गुजरातमध्ये 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पण यावेळी मोदींच्या भाषणातून 'विकास' गायब झाला आहे. मी विचारलेल्या 10 प्रश्नांची उत्तरेही दिली नाहीत. मतदान सुरू झाले पण अद्याप जाहीरनामा आलेला नाही. म्हणजे आता 'अब भाषण ही शासन' असे आहे का? गुजरातमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला शनिवारी सुरुवात झाली. 


भाजपसाठी आता 'भाषण ही शासन..' 
- राहुल गांधींनी ट्वीटमध्ये लिहिले, गुजरातमध्ये 22 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मला फक्त एवढे विचारचे आहे की, यावेळी मोदींच्या भाषणातून 'विकास' का गायब झाला आहे. 
- मी गुजरातच् रिपोर्ट कार्ड म्हणत 10 प्रश्न विचारले. त्यांचे उत्तरही मिळाले नाही. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपेपर्यंतही जाहीरनामा नाही. म्हणजे आता ‘भाषण ही शासन’ आहे का? 

 

ट्विटरवर प्रश्नांची मालिका.. 
राहुल गांधी ट्विटरवर 22 वर्षांचा हिशेब मागत एक मालिका चालवत आहेत. त्यावर रोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. गुजरात के हालात पर ‘प्रधानमंत्री जी से सवाल’ लिहून ते प्रश्न ट्विट करतात.


पुढील स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधींना आतापर्यंत विचारलेले प्रश्न...

बातम्या आणखी आहेत...