आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभावनगर (सुरत) - अलंग शिप ब्रेकिंग यार्डमध्ये दीर्घकाळानंतर विशालकाय पॅसेंजर शिप भंगारात जाण्यासाठी येथे आली आहे. ही शिप येताच येथे वर्दळही वाढली आहे. 10 मजली या जहाजात अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. प्लॉट नं. 103 हनी शिप ब्रेकिंग यार्डमध्ये लंगर लावून रोखण्यात आली 'ओशन गाला'चे वजन 19,177 टन आहे.
अशी आहे क्रूझची स्पेशिअॅलिटी...
- 1606 पॅसेंजर क्षमतेच्या जहाजाची 1982 मध्ये निर्मिती झाली होती. याची लांबी 185 मीटर आणि रुंदी 27 मीटर आहे.
- जहाजाच्या आत स्वीमिंग पूल, जिम, कॅसिनो, थिएटर, रेस्टोरेंट्ससहित अनेक आधुनिक सुविधा आहेत.
- 'ओशन गाला' विश्वातील प्रसिद्ध थॉमसन क्रूझद्वारे चालवले जात आहे.
- यात एकसाथ 540 क्रू मेंबर असायचे आणि त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था होती.
काय आहे अलंग शिप यार्ड?
- गुजरातचे एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच ‘अलंग शिपयार्ड’चा वेगळाच नजारा आहे. एखाद्या उंच जागेवर उभे राहून पाहिल्यास अनेक किमीपर्यंत तुम्हाला मोठमोठ्या जहाजांचा मलबा दृष्टीस पडेल.
- जर्जर झालेली जहाजे पाहून तुम्ही पहिल्या नजरेत अंदाज बांधू शकत नाहीत की, कधीकाळी ही जहाजे विशालकाय समुद्राचे पाणी कापत भरधाव वेगाने धावायची. परंतु, अलंग शिपयार्डमध्येच या जहाजांची अंत्ययात्रा असते हे सत्य आहे.
चोहीकडे लोखंड आणि लाकडाचे ढीग
- मोठमोठ्या क्रेनचे सायरन, मशीन्सचा आवाज आणि लोखंडाचा टणत्कार कानांवर आदळत राहतो.
- तुम्ही जेथेही पाहाल मजुरांच्या टोळ्या मोठमोठ्या जहाजांना नेस्तनाबूत करताना दिसतील.
- या शिपयार्डची सर्वात खास बाब अशी की, जवळजवळ 30 वर्षांपूर्वी ही जागा उजाड होती, परंतु आज जगात फ्रान्सनंतर दुसरी सर्वात मोठी शिपयार्ड बनली आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या शिपयार्डचे आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.