आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GF सोबत लग्न करण्यासाठी आयकर अधिकाऱ्याने Wife ला असे केले मार्गातून दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकवर्षापूर्वी मुनेश आणि लोकेशकुमार यांचे लग्न झाले होते. - Divya Marathi
एकवर्षापूर्वी मुनेश आणि लोकेशकुमार यांचे लग्न झाले होते.

बडोदा - येथील आयकर अधिकाऱ्याने प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या केली. हत्येनंतर 5 फूट खड्डा खोदून त्यात मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्याने गुन्हा मान्य करत म्हटले की प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीचा गळा आवळून खून केला. 

 

अशी केली होती हत्येची योजना 
- हत्येचा आरोपी आयकर अधिकारी लोकेश कुमारने सांगितले की हत्येचा प्लॅन फार आधी तयार केला होता. त्यासाठी मी माझा मित्र पूर्वेंद्र याला आयकर विभागात नोकरी देण्याचे आमिष दिले होते. त्याने त्याच्या नावाने एक घर किरायाने घेतले. त्या घराच्या मागच्या भागात मजुरांना बोलावून पाच फुटांचा खड्डा खोदून घेतला. खत निर्मितीसाठी खड्डा खोदायचे असल्याचे सांगितले होते. 
- यानंतर लोकेशकुमारने पत्नी मुनेशला फोन करुन मी फार अडचणीत आहे, तु कोणालाही काही न सांगता बडोद्याला ये असे सांगितले. प्लॅन नुसार मुनेश 11 एप्रिल रोजी बडोद्याला आली. दुसऱ्या दिवशी  अर्थात 12 एप्रिल रोजी दुपारी लोकेशकुमारने एका दोरीने तिचा गळा आवळला. तिने आवाज करु नये म्हणून पूर्वींद्रने तिचे तोंड दाबून ठेवले होते. 
- हत्येनंतर मुनेशचा मृतदेह घरामागील खड्ड्यात टाकला आणि पुर्वींद्रने तो खड्डा बुजवला. अजय देवगण याच्या दृष्यम चित्रपटात अशा पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मात्र ती आयडिया आम्ही घेतली नाही असे आरोपी लोकेशकुमार म्हणाला. 


कॉल डिटेलने खूनाचे रहस्य उलगडले 
- मुनेशच्या वडिलांनी गांधीनगर पोलिस स्टेशनमध्ये मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. दुसरीकडे लोकेशच्या वडिलांनी आधीच सुन बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आरोपीने पत्नीचा मोबाइलही फॉर्मेट केला जेणे करुन कॉल डिटेल्स मिळणार नाही. परंतू पोलिस आणि मुनेशच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु ठेवला. 
- दरम्यान, गांधीनगरचे पोलिस अधीक्षक कवेंद्रसिंह सागर यांनी मुनेशचे मोबाइल कॉल डिटेल्स मागवले. त्यावरुन लक्षात आले की तिचा शेवटचा कॉल 11 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता लोकेशला केला होता. त्यानंतर लोकेश कित्येक तास त्याच्या प्रेयसीसोबत बोलत होता. 
- पोलिसांनी लोकेशला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा, तो पोपटा सारखा बोलू लागला आणि पत्नी मुनेशची हत्या केल्याचे कबूल केले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आरोपी लोकेशकुमारने कुठे गाडले होते पत्नीला... 

बातम्या आणखी आहेत...