आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा एक नेता म्हणतो, घराघरातून अफजल निघेल, अशा लोकांना मत देणार का? : मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिसागर (गुजरात) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महिसागर येथील सभेत काँग्रेसच्या एका नेत्याच्या वक्तव्याचा उल्लेख करत हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, काँग्रेसचा एक नेता आणि स्टार कँपेनर सलमान निजामी काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. त्याने तर लष्कराला बलात्कारीही म्हटले आहे. एवढेच नाही, एकदा तर त्याने घरा घरातून अफजल तयार होईल, असेही म्हटले होते. पंतप्रधानांच्या या टीकेनंतर निजामी यांनी ते बनावट ट्वीटचा उल्लेख करत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपण कधीही अफजलचे समर्थन केले नाही, असेही ते म्हणाले. तर काँग्रेसने सलमान काँग्रेसचे सदस्यच नसल्याचे म्हटले. 


सलमान निजामींच्या या वक्त्यांचा उल्लेख?
1) लष्कर रेपिस्ट आहे 

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस नेते सलमान निजामी जे त्यांचे स्टार प्रचारक आहेत ते मूळचे काश्मीरचे आहेत. त्यांना स्वतंत्र काश्मीर हवा आहे. ते म्हणतात लष्कर बलात्कारी आहे. गुजरातची जनता त्यांना माफ करेल का? सैनिकांना बलात्कारी म्हणणारे राहुल गांधींसाठी मते मागत आहेत. हे कसे सहण करू शकतो. 


2) घरा घरात तयार होईल अफजल 
याने तर असेही म्हटले होते की, घरा घरातून अफजल तयार होईल. दहशतवादी अफजल गुरूला फाशी का झाली होती. गुजरातच्या घरांमध्ये दहशतवाद्यांना जन्म द्यायचा आहे का. गुजरातचा मुस्लीमही असे म्हणत नाही. 


3) मोदीचे आई वडील कोण?
सलमान निजामी विचारतो,  मोदी तुझा बाप कोण? तुझी आई कोण आहे? अशी भाषा तर आपण शत्रूसाठीही वापरत नाही. मी सांगतो माझी आई कोण आहे. भारतमाता माझी आई आहे, जीवनभर तिची सेवा करेल. मला नीच म्हटले गेले, तुम्हाला हे मान्य आहे का. गुजरातच्या सुपुत्राबद्दल कोणी असे बोललेले तुम्हाला चालेल का?  


निजामी आणि काँग्रेसचे स्पष्टीकरण.. 
मोदींच्या आरोपांनंतर काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेतली. त्यात वरिष्ठ नेते राजीव शुक्ला म्हणाले, सलमान कोण हे आम्हाला माहिती नाही. तो पार्टीच्या कोणत्याही पदावर नाही. आम्ही म्हणून की भाजपमध्ये कोणीतरी रामलाल आहे आणि तो असे म्हणतो. दुसरीकडे सलमान निजामीने म्हटले, मी देश आणि लष्कराच्या विरोधात ट्वीट केले नाही. काश्मीरमध्ये माझ्या कुटुंबाने बलिदान केले आहे. मी अफजलचा समर्थक नाही. नरेंद्र मोदी बोलत आहेत ते ट्वीट्स 2013 चे आहेत. तेव्हा माझे अकाऊंट हॅक झाले होते. 


मोदींनी घेतली 12 नेत्यांची नावे.. 
- मोदींनी शुक्रवारी बनासकांठामध्ये काँग्रेसवर सर्वात मोठा हल्लाबोल केला होता. मणिशंकर अय्यर यांच्या वादानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधींपासून इमरान मसूद, रेणुका चौधरी, जयराम रमेश, बेनी प्रसाद वर्मा, गुलाम नबी आजाद, प्रमोद तिवारी, आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, राशीद अल्वी आणि मनीष तिवारी अशा 12 नेत्यांची नावे त्यांनी घेतली. यांनी वेळोवेळी मला नीच, बंदर, रावण, भस्मासुर, हिटलर, मुसोलिनी आणि गद्दाफी म्हटल्याचे मोदींनी सांगितले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...