आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी अहमदाबादला आले. पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. दोघांनी रोड शो केला. दोन्ही नेते एकाच कारने साबरमती आश्रमात गेले. तेथे नेतन्याहूंनी पत्नी सारा यांच्यासोबत राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. नेतन्याहूंनी चरखा चालवला आणि पतंगही उडवला. मोदींनी ४ वर्षांत तिसऱ्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला अहमदाबादमध्ये आणले आहे. याआधी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग येथे आले होते.
आय-क्रिएटमध्ये ‘आय’ छोटे केले, अहंकार मोठा होऊ नये हा हेतू : पंतप्रधान मोदी
मोदींनी नेतन्याहूंसोबत बनासकांठात आय-क्रिएट सेंटरचे उद््घाटनही केले. मोदी म्हणाले की, आय क्रिएटमध्ये आय लहान आणि क्रिएट मोठे लिहिले, अहंकार मोठा होऊ नये हा हेतू. आय मोठे केल्यास रचनात्मकतेत बाधा येऊ शकत होती. त्यामुळे सुरुवात लहान आयने करून मोठे स्वप्न पाहिले आहे.
आता जगाला आयपॅड, आयपॉडसोबत आय क्रिएटबद्दलही जाणून घ्यावे लागेल : नेतन्याहू
नेतन्याहू म्हणाले की, लोकांना आतापर्यंत आयपॅड आणि आयपॉडबद्दल माहिती आहे. पण आता आय क्रिएटबद्दलही जाणून घ्यावे लागेल. मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ही संकल्पना दिली होती. मोदी दूरदृष्टीने देशाला पुढे नेत आहेत. मी आणि मोदी दोघेही तरुण आहोत. आमचे विचारही तरुण आहेत. जय हिंद.
खारे पाणी स्वच्छ करणारी जीप दिली
आय क्रिएट सेंटरमध्ये नेतन्याहूंनी खारे आणि अस्वच्छ पाणी साफ करणारी जल शुद्धीकरण जीप मोदींना भेट दिली. ही जीप व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बनासकांठाच्या सुइगाममध्ये चालवण्यात आली.
कृषी क्षेत्रात इस्त्रायलने केली मदत
- इस्त्रायलसोबत भारताने कृषी क्षेत्राशी संबंधीत काही करार केले आहेत या क्षेत्रातील 28 पैकी 25 सेंटर ऑफ एक्सिलन्स तयार देखील झाले आहेत. यामुळे भारताला कृषी क्षेत्रासाठी मोठी मदत होणार आहे. यातील 3 गुजरातमध्ये असतील.
हेही वाचा...
साबरमती आश्रमात नेतन्याहू-सारा यांनी चरखा चालवला, पतंगबाजी केली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.