आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - कठुआ, उन्नाव आणि सुरतेत अल्पवयीनांवरील बलात्कारामुळे देशभरात संताप उसळलेला असताना मंगळवारी यूपी आणि गुजरातेत लहान मुलींवर बलात्काराच्या दोन घटना समोर आल्या. आरोप आहे की, एटामध्ये बलात्कारानंतर 8 वर्षीय बालिकेची हत्या करण्यात आली. दुसरीकडे, गुजरातच्या राजकोटमध्ये शेजाऱ्यानेच 9 वर्षीय बालिकेवर 15 दिवसांत 4 वेळा बलात्कार केला. पोलिसांनी दोन्ही घटनांतील आरोपींना अटक केली आहे. तथापि, मागच्या काही दिवसांत कठुआ, उन्नाव आणि सुरतेत झालेल्या लहान मुलींवरील रेपच्या घटनांमुळे विरोध प्रदर्शने, निदर्शने होत आहेत.
बालिकेने आईला सांगितले शेजाऱ्याचे कृत्य
- पीड़ित बालिका विधवा आईसोबत रोजकोटमध्ये राहते. तिची आई उदरनिर्वाहासाठी आसपासच्या काही घरांमध्ये धुणीभांडी करते. रविवारी जेव्हा ती कामावरून परतली तेव्हा मुलगी घरात नव्हती. हाक मारल्यावर मुलगी शेजारी कमलेश ऊर्फ मुरली कालू भरवाड़ (23) याच्या घरातून धावतच आली.
- महिलेने तिला घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा तिने भीत-भीतच सांगितले की, ती कमलेशच्या घरात खेळण्यासाठी गेली होती. कमलेशने मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ सुरू करून तिचे सर्व कपडे उतरवले आणि छेडछाड करू लागला.
- चिमुकलीने तिच्यावर यापूर्वीही आरोपी कमलेशने केलेल्या अत्याचाराची आणि कुकर्माची माहिती दिली. चिडलेल्या आईने कमलेशच्या घरात जाऊन त्याला जाब विचारला. यावर आरोपी कमलेश फरार झाला. महिलेने यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
सुरत रेप: सीसीटीव्ही आणि कॉल डिटेलमधून आरोपींचा शोध
- 6 एप्रिल रोजी 11 वर्षीय बालिकेची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि आसपासच्या परिसरातील मोबाइल फोनच्या डिटेल्सचा शोध घेतला जात आहे. सुरत पोलिस आणि क्राइम ब्रँच दोन्ही टीम मिळून आरोपींची धरपकड करण्याचा प्रयत्न केला आहे.
- तथापि, चिमुकलीच्या शरीरावर 80 हून जास्त जखमांचे व्रण मिळाले. चिमुकलीचा मृतदेह पांडेसरा परिसरातील स्टेडियमजवळ आढळला होता. तथापि, मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.
- या घटनेनंतर एका बिल्डरने पीडितेची ओळख सांगणाऱ्या आणि आरोपींचा सुगावा देणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यापूर्वी गुजरातच्या अनेक परिसरातील लोकांनी कँडल मार्च काढला आणि तोंडावर काळीपट्टी बांधून निदर्शने केली होती.
कठुआ गँगरेप: सुनावणी चंडीगडमध्ये करण्यासाठी सुप्रीम कोर्टात निवेदन
- कठुआ गँगरेपची सुनावणी चंदिगडला ट्रान्सफर करण्याच्या मागणीवर सोमवारी सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीर सरकारला नोटीस जारी करून उत्तर मागितले. सोबतच पीडित कुटुंब, त्यांचे सहकारी तालिब हुसेन आणि वकील दीपिका सिंह यांना सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश देण्यात आले. पुढची सुनावणी 27 एप्रिल रोजी होईल.
- पीडित कुटुंबाकडून सीनियर अॅडवोकेट इंदिरा जयसिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून म्हटले की, कठुआचे वातावरण ठीक नाही. निष्पक्ष सुनावणीसाठी पीडित कुटुंबाला हा खटला चंदिगडला ट्रांसफर करायचा आहे. पीड़ितेच्या वकिलांना मिळत असलेल्या धमक्यांची माहितीही त्यांनी कोर्टाला दिली.
- दुसरीकडे, याप्रकरणी सोमवारपासून जम्मू-काश्मीरच्या जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. आरोपींनी क्राइम ब्रांचचे आरोप फेटाळत निर्दोष असल्याचा दावा केला. मास्टरमाइंड सांझी राम यांच्यासह अनेक आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणीही करण्यात आली. कोर्टाने 28 एप्रिलपर्यंत सुनावणी टाळली.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.