आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपाणी यांची मुख्यमंत्रिपदाची शपथ, नितीन पटेल उपमुख्यमंत्री; 9 कॅबिनेटमंत्र्यांत 5, राज्यमंत्र्यांत जुन्या 5 जणांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- विजय रूपाणी आणि त्यांच्या १८ सहकारी मंत्र्यांनी मंगळवारी एका शानदार समारंभात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रुपाणी यांनी दुसऱ्यांदा ही धुरा हाती घेतली आहे. नितीन पटेल हे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री असतील.  


राज्यपाल आे. पी. कोहली यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती होती.  मोदी यांच्या  वेळची दुपारी १२.३९ वाजताची प्रथा मोडून त्यांनी ११.३५ मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह ६ पाटीदार समुदायाचे मंत्री आहेत. तीन क्षत्रिय, एक ब्राह्मण, दोन आदिवासी व एक दलित यांनाही स्थान मिळाले. कॅबिनेटमध्ये एक आदिवासी, एक दलित, एक आेबीसी व एका क्षत्रिय समुदायाच्या मंत्र्याचा समावेश आहे. १० राज्यमंत्र्यांमध्ये ५ आेबीसी, दोन क्षत्रिय, एक पाटीदार, एक आदिवासी तर कॅबिनेटमध्ये एका महिलेला संधी दिली गेली आहे. रुपाणी जैन समुदायाचे आहेत. यंदाच्या मंत्रिमंडळात ८ नवीन चेहऱ्यांना संधी दिली. ७ जागा रिक्त ठेवल्या आहेत.

 

राज्यातील एकूण ५० टक्के मते  मिळवल्याचा आनंद : फडणवीस  
राज्यात भाजपला एकूण ५० टक्के मते संपादन करता आली, याचा अधिक आनंद आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. भाजपशासित राज्यांतील सर्व १८ मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंंद्र मोदी, रुपाणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. समारंभाला  लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथसिंह, नितीश कुमार, योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती.  

 

 

एकमेव महिलेचा समावेश 

रुपाणी यांच्या मंत्र्यांमध्ये सहा जण पटेल समुदायाशी संबंधित आहेत. भावनगर पूर्व मतदारसंघातील आमदार  विभावरीबेन दवे या मंत्रिमंडळातील एकमेव महिला आहेत. कॅबिनेटमध्ये पाच चेहरे जुने आहेत, 

 

मोदींनी केला रोड-शो 
मोदी अहमदाबाद विमानतळावरून रोड-शो करत समारंभस्थळी दाखल झाले. बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार समारंभात सहभागी झाले. ते पंधरा वर्षांनंतर गुजरातला आले. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शंकरसिंह वाघेला व केशूभाई पटेलदेखील उपस्थित होते.

 

शपथ घेतलेले कॅबिनेटमंत्री पुढीलप्रमाणे

भूपेंद्र चुडासमा, आर.सी. फालदू, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गणपतसिंह वासावा, जयेश राडाडिया, दिलीप ठाकूर, ईश्वर परमार. 
राज्यमंत्री : प्रदीपसिंह जडेजा, परबात पटेल, जयद्रथ सिंह परमार, रमन पाटकर, पुरुषोत्तम सोलंकी, ईश्वरसिंह पटेल, वासन अहिर, किशोर कानानी, बचुभाई खाबाड, विभावरीबेन दवे.  

 

 

पुढे पाहा सबंधित PHIOTOS...

बातम्या आणखी आहेत...