आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Jagannath Temple Gujarat Election Last Day Campaign Bjp Congress News And Updates

मोदींना सीप्लेनमधून उडायचे आहे, चांंगले आहे, पण गुजरातसाठी काय केले? -राहुल यांचे टीकास्त्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद -   काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदा राहुल गांधींनी मंगळवारी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. गुजरात निवडणुकीतील मंदिर पॉलिटिक्सवर ते म्हणाले, "मी गुजरातेत ज्या मंदिरात गेलो, तेथील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना केली आहे." यादरम्यान त्यांनी मोदींच्या भाषणातील भाषा, जीएसटी, बेरोजगारी आणि सीप्लेनमधून अंबाजी मंदिरात जाण्यावरही टीका केली. यावर राहुल म्हणाले, मोदींना जर सीप्लेनने उडायचे आहे, तर चांगली बाब आहे. परंतु, गुजरातच्या जनतेसाठी त्यांनी काय केले? हाच प्रश्न आहे. याआधी त्यांनी द्वारकाच्या जगन्नाथ मंदिरात पूजा केली. राहुल यांचा हा 27वा मंदिर दौरा होता. आज गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 14 डिसेंबर रोजी 93 जागांसाठी मतदान होईल. 18 डिसेंबरला निकाल घोषित होतील.

 

राहुल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 

1) गुजरातेत एकतर्फी विकास
- राहुल गांधी म्हणाले, गत 22 वर्षांत मोदी आणि विजय रूपाणी यांनी वन सायडेड विकास केला आहे. फक्त 10 जणांचा विकास झाला. नॅनोसाठी 33 हजार कोटी कुठे गेले? भाजपला या निवडणुकीत आपले स्थान कायम ठेवता आले नाही. नरेंद्र मोदींच्या शेवटच्या काही भाषणांतून हे स्पष्ट दिसते. पंतप्रधान एकतर काँग्रेसबद्दल बोलत आहेत किंवा स्वत:बद्दल.

 

2) मंदिरात जायला मनाई आहे काय?
- राहुल म्हणाले, आतापर्यंत मी गुजरातेत जेवढ्या मंदिरांत गेलो तेथे गुजरातच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली. मी मंदिरात जाण्याला मुद्दा बनवण्यात आले. एखाद्याला मंदिरात जायलाही मनाई आहे काय?
- मी केदारनाथला गेलो होतो. तेथे जात राहतो. ही भाजपचीच कहाणी आहे की मी मंदिरात जात नाही. केदारनाथ गुजरातमध्ये आहे काय?

 

3) GST ने गुजरातच्या व्यापाऱ्यांचे नुकसान
- राहुल म्हणाले, गब्बर सिंग टॅक्सने गुजरातच्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. गुजरातच्या एका शिक्षकाने मला रडत सांगितले की, महागाई तर वाढली, पण आमची सॅलरी नाही वाढली.

 

4) काँग्रेस शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, तरुणांना रोजगार देणार.
- राहुल गांधी म्हणाले, आम्ही तरुणांना रोजगार देऊ, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. आम्ही 3-4 महिन्यांत गुजरातच्या जनतेचे म्हणणे जवळून ऐकले आहे. आम्ही जे काही बोललो, ते केले आहे. मग भरपाई असो, कर्जमाफी असो, शिक्षण वा मग शेतकऱ्यांना दिली जाणारी मिनिमम सपोर्ट प्राइस असो.

 

आतापर्यंत या मंदिरांत गेले राहुल गांधी 

- श्री रणछोड़जी मंदिर, मोगलधाम-बावला मंदिर, द्वारकाधीश, कागवडमध्ये खोडलधाम, नाडियाडचे संतराम मंदिर, पावागढ़ महाकाली, नवसारीत ऊनाई माता मंदिर, अक्षरधाम मंदिर, बहुचराजीचे मंदिर, कबीर मंदिर, चोटिला देवी मंदिर, दासी जीवन मंदिर, राजकोटचे जलाराम मंदिर, वलसाडचे कृष्णा मंदिर, शंकेश्वर जैन मंदिर, वीर मेघमाया, बादीनाथ मंदिर आणि सोमनाथ मंदिर। याशिवाय ते काँग्रेसच्या नवसर्जन यात्रेदरम्यान 5 आणखी लहान-मोठ्या मंदिरांत दर्शनासाठी गेले.

 

राहुल यांनी सोनिया गांधींशी करून दिले पुजाऱ्याचे बोलणे
- राहुल गांधी शुक्रवारी अहमदाबादेत मोगलधाम-बावला मंदिरात पोहोचले आणि पूजा केली. यादरम्यान पुजारी सरदार सिंह परमार यांनी त्यांना सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. सोनिया लवकर बऱ्या होण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि राहुल यांना प्रसादात एक चुनरी भेट दिली.
- तेव्हा राहुल यांनी पुजाऱ्यांना विचारले की, तुम्ही सोनियाजींशी बोलाल का? पुजारी काही बोलणार तेवढ्यात राहुल यांनी मोबाइलमधून कॉल करत म्हणाले- माँ, आप पुजारीजीसे बात कीजिए. राहुल म्हणाले की, प्रसादात मिळालेली चुनरी ते आई आणि बहीण प्रियंका यांना देतील.

बातम्या आणखी आहेत...