आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकीम (सुरत) - दक्षिण गुजरातच्या किम येथील शुभम पढियार (9) मेडिकल सायन्ससाठी आव्हान ठरला आहे. शुभमला दोरीने बांधून ठेवावे लागते, कारण त्याला कळत नाही की तो कुठे चाललाय. यामुळे सात वर्षांपासून त्याचे कुटुंब आपल्या मुलाला बांधून ठेवण्यासाठी विवश आहे. एप्रिल 2008 मध्ये जन्मलेल्या शुभमला जन्माच्या वेळी अडचण निर्माण झाली होती.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- एक वर्षे वयातच तो वॉकरमधून पडल्याने त्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला फिट्स येऊ लागले. परंतु तो जेव्हा चालायला लागला तेव्हा त्याच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आले.
- डॉक्टरांना दाखवले परंतु काहीही फायदा झाला नाही. त्याचे वडील देवजी परमार ऑटो चालवतात. आई गीताबहन मुलाच्या आजारावर बोलताना सारख्या रडायला लागतात.
- त्या सांगतात की- शुभम कुणालाच ओळखत नाही. त्याला झोपेतही फिट्स येतात. तो कधीही उठून चालायला लागतो.
घरी परत जायचे त्याला लक्षातच राहत नाही
- कसाबसा चालत शुभम (9) घरातून बाहेर निघून जातो, परंतु त्याला परत यायचे लक्षात राहत नाही. यामुळे त्याला बांधून ठेवणे सुरू केले.
- दोन वर्षे वयापासून सुरू झालेले हे सत्र आतापर्यंत सुरूच आहे. सुरतचे बालरोग विशेषज्ञ डॉ. दिगंत शास्त्री म्हणाले, मेंदूत गाठ असल्यावर फिट्स येऊ शकतात- यावर उपचार आहेत.
- परंतु शुभमच्या केसमध्ये असे नाहीये. तो नॉन रिस्पॉन्सिव्ह एपिलेप्सी या आजाराने ग्रस्त आहे. तपासणीनंतर उपचारांसाठी त्यावर ऑपरेशनची शक्यताही नाही.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.