Home | National | Gujarat | Shocking: बाहेर आई शेजारणीशी बोलत होती, घरात जाऊन पाहताच कोसळली.. 8 वर्षांच्या मुलाने घेतली फाशी Shocking 8 Year Old Boy Suicide In Surat Latest News And Updates

Shocking: बाहेर आई शेजारणीशी बोलत होती, घरात जाऊन पाहताच कोसळली.. 8 वर्षांच्या मुलाने घेतली फाशी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2018, 03:01 PM IST

शहरात एका 8 वर्षांच्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुरतमध्ये एवढ्या कमी व

 • Shocking: बाहेर आई शेजारणीशी बोलत होती, घरात जाऊन पाहताच कोसळली.. 8 वर्षांच्या मुलाने घेतली फाशी Shocking 8 Year Old Boy Suicide In Surat Latest News And Updates

  सुरत - शहरात एका 8 वर्षांच्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुरतमध्ये एवढ्या कमी वयात आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे. मुलाची आई शेजारच्या महिलांशी बाहेर बोलत होती, त्यादरम्यान मुलाने हे पाऊल उचलले.

  असे आहे पूर्ण प्रकरण...
  - उमंग रेसिडेंसीमधील रहिवासी संजय पटेल यांचा इयत्ता-2 मध्ये शिकणाऱ्या मुलाला ब्रेन ट्यूमर होता.
  - पोलिस म्हणाले की, आई दरवाजावर इतर दोन महिलांशी बोलत होती. अक्षयने नायलॉनची दोरी शोधून पंख्याला बांधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याची उंची पडली.
  - अक्षयने कुर्सी लावून त्यावर एक गादी आणि एकावर एक 4-5 तक्के ठेवले. यानंतर पंख्याला दोरी बांधून गळफास लावला.
  - काही वेळानंतर जेव्हा अक्षय बाहेर आला नाही म्हणून आईने घरात जाऊन पाहिले, तेव्हा आतील दृश्य पाहून तिची शुद्धच हरपली व ती जमिनीवर कोसळली.
  - माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त आर. डी. फलदू यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
  - पोलिसांनी हत्येचा संशयही व्यक्त केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर वास्तविकता समोर येईल. आजारपणामुळे तणावात येऊन असे पाऊल उचलल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

  टीव्हीवर असे दृश्य पाहून, हे करण्याची शक्यता
  - मनोचिकित्सक डॉ. मुकुल चोकसी यांच्या मते, लहान मुले टीव्हीवर अनेकदा असे एखादे दृश्य पाहतात. किंवा तणावात येऊनही असे पाऊल उचलू शकतात.

  एसीपी म्हणाले हत्या

  एसीपी आर. डी. फलदू म्हणाले की, 8 वर्षे वयात अशा प्रकारे फाशी घेणे शक्य वाटत नाही. पोस्टमार्टमनंतरच स्पष्ट होईल की, नेमके काय झाले असावे.

Trending