आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुरत - गुजरात पोलिसांनी 11 वर्षीय बालिकेवरील बलात्कार आणि हत्येच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. सीसीटीवी फुटेजमधनू एका काळ्या रंगाच्या कारचा सुगावा लागल्याने पोलिसांनी राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूरमधून 2 आरोपींना अटक केली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, चिमुरडीचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. 6 एप्रिल रोजी अल्पवयीन मुलाचा मृतदेह पांडेसरा परिसरात आढळला होता. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पाशवी बलात्काराची बाब समोर आली होती.
- पोलिसांच्या मते, आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची खूप मदत झाली. कारची ओळख होण्याआधी सर्वात आधी त्यांचे मालक हरसहाय गुर्दर यांना अटक करण्यात आली. यानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.
- हरसहायच्या घटनेचा मास्टरमाइंड आहे. तो मार्बल लावण्याची ठेकेदारी करतो आणि 6 महिन्यांपूर्वी चिमुरडी आणि तिच्या आईला राजस्थानातून सुरतेत आणले होते. येथे त्याने दोघींना सुरतच्या कामरेज परिसरात ठेवले. आरोपी नेहमी महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी येत-जात होता.
आरोपीचे मृत मुलीच्या आईशी अवैध संबंधांचा संशय
- वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, हरसहायच्या पत्नीला त्याचे सुरतेतील महिलेशी अवैध संबंध असल्याचे कळले होते. यावरून पती-पत्नीची नेहमी भांडणे होऊ लागली.
- दुसरीकडे, सुरतेत राहणारी महिलाही सारखी हरसहायकडे पैशांची मागणी करायची. महिलेवरून दररोज पत्नीशी भांडणे होत असल्याने तो त्रस्त झाला होता. त्याने महिलेला कुठेतरी गायब केले. यानंतर तिच्या मुलीला आपल्या घरी आणले. मग आता त्या मुलीवरून घरात वाद होऊ लागला.
- एका आठवड्यापर्यंत हरसहायने चिमुकलीला घरात बंधक बनवून ठेवले. तिचा छळ केला. बलात्काराचा आरोपी हरसहायने चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. चार दिवसांनी तो पत्नी आणि मुलासोबत राजस्थानातील आपल्या गावी कुनकटा खुर्दला निघून गेला. परंतु, पोलिसांनी त्याला तिथे जाऊन अटक केली.
चिमुरडी आणि महिलेचे डीएनए सॅम्पल तपासणीसाठी पाठवले
- चिमुरडीचा मृतदेह भेटल्याच्या 3 दिवसांनंतर 9 एप्रिल रोजी पांडेसरामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिचीही हत्या गळा दाबून करण्यात आली होती. पोलिसांच्या मते, ही महिला त्या मुलीची आई असू शकते. खात्री पटवण्यासाठी मृत बालिका आणि महिलेच्या डीएनएचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
केसची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होईल: गृह राज्यमंत्री
- गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले की, आरोपींना गुजरातेत आणण्यात येत आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होईल. यासठी सरकार स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर नियुक्त करेल. 9 एप्रिल रोजी चिमुकलीच्या मृतदेहापासून काही किमी अंतरावर एका महिलेचाही मृतदेह आढळला होता. हा त्या बालिकेच्या आईचा असू शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.