आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावलसाड (गुजरात) - वलसाड येथील लव्ह-जिहाद प्रकरणाला बुधवारी नवे वळण लागले आहे. कच्छी भानूशाली समाजाची युवती तिचा प्रियकर सलमान शेखसोबत विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होती. मुंबई पोलिसांनी दोघांना सोमवारी विमानतळावर अटक केली. युवती घरातून घेऊन निघालेल्या पैशांमधील 15 लाख रुपये युवकाने खर्च केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 91 लाख रुपये जप्त केले आहेत.
पतीने पत्नीवर केला चोरीचा आरोप
- सलमान उर्फ सलीम शेख सोबत विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेली युवती विवाहित आहे. तिच्या पतीने आरोप केला की तिने घरातील 98 लाख रुपये चोरी केले होते. चोरीच्या आरोपानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
- वापी येथील ट्रान्सपोर्ट बिझनेसमॅन कीर्तिभाई कटारिया यांची मुलगी प्रियाचे लग्न तीन महिन्यांपूर्वी वलसाड येथील प्रशांत करसन भानुशाली यांच्यासोबत झाले होते.
- बिझनेसमॅन कीर्तिभाई यांची तब्ब्यत खराब असल्याचे कळाल्यानंतर प्रिया वडिलांच्या भेटीसाठी वापीला आली होती. वडिलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्यानंतर ती घरी गेली आणि घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन प्रियकरासोबत मुंबईला पळून गेली होती.
- प्रियाच्या आईने मुलीच्या अपहरणाची तक्रार पोलिसात दिली. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यात आला. या दोघांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली.
दोघांकडून 91 लाख रुपये जप्त
- वलसाड पोलिस दोघांना सोमवारी रात्री वापीला घेऊन आले. त्यानंतर वापी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने व्हीएव्ही रोडवरील पेट्रोल पंपावरुन 91 लाख रुपये जप्त केले.
- युवती जे पैसे सोबत घेऊन गेली होती. त्यातील 15 लाख रुपये दोघांनी खर्च केले होते.
पतीने दिली पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार
- प्रिया भानूशालीचा पती प्रशांतने पत्नी आणि तिचा प्रियकर सलमानविरोधात पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की घरातून 98 लाख रुपये चोरी झाले आहेत. या चोरीमागे या दोघांचा हात आहे.
- प्रिया घरातून पैशांनी भरलेली बॅग घेऊन निघाली होती. ती सलमान उर्फ सलीम शेखने हाजी नाथानी याला दिली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.