Home | National | Gujarat | Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign

लव्ह जिहाद : मुंबईहून दुबईला उड्डाण करण्यापूर्वीच प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळ्यात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 20, 2018, 04:16 PM IST

वापीच्या युवक-युवतीला दुबईसाठी उड्डाण करण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी त्यांनी वापीला नेण्यात आले.

 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign

  वापी (गुजरात) - वलसाड येथे सासरी राहाणारी 23 वर्षांची युवती आई-वडिलांच्या भेटीसाठी माहेरी वापीला आली होती. सासरी परत जाते असे सांगून रविवारी ती आई-वडिलांना भेटून निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत वलसाडला पोहोचली नाही, तेव्हा रीना (बदललेले नाव) बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली. रीनाच्या मोबाइल लोकेशनवरुन ती महाराष्ट्रात असल्याचे कळाले. वापी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेतला तेव्हा युवती एका तरुणासोबत मुंबई विमानतळावर सापडली. विमान उड्डाण करण्याच्या अवघ्या 15 मिनिट आधी प्रेमी युगुलाला पोलिसांनी अटक केली.

  दोघांना वापीला आणल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ

  काय आहे प्रकरण
  - तीन महिन्यांपूर्वी रीनाचे लग्न झाले. ती वलसाडमध्ये सासरी राहात होती. रविवारी तिच्या वडिलांची तब्यत खराब झाली आणि त्यांना हॉस्पिलमध्ये दाखल केले. हा निरोप मिळाल्यानंतर रीना वडिलांच्या भेटीसाठी वापीला आली होती. आई-वडिलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्यानंतर, घराची चावी घेऊन रीना हॉस्पिटलमधून बाहेर पडली. रात्री आई घरी आली तेव्हा रीना घरात नव्हती. शोधाशोध केली तेव्हा रीना कुठेच सापडली नाही. सासरी वलसाडमध्ये विचारणा केली तर तिथेही ती गेली नव्हती. रीनाच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वापी टाऊन पोलिस स्टेशनमध्ये दिली.
  - पोलिसांनी रीनाचे मोबाइल लोकेशन तपासले. ती महाराष्ट्रात असल्याचे कळाले. नंतर अशी माहिती समोर आली की सलमान शेख नावाच्या तरुणासोबत रीना मुंबईला गेली आहे.
  - सलमान आणि रीना मुंबईतील सहारा एअरपोर्टवर असल्याची पक्की माहिती वापी पोलिसांना मिळाली. दोघे दुबईला पळून जाणार असल्याचे कळाले. वापी पोलिसांनी मुंबई पोलिसांना संपर्क करुन दोघांना पकडण्याची विनंती केली. परंतू एफआयआर दाखल नसल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी कारवाईस नकार दिला.
  - यानंतर वापी पोलिसांनी मुलीच्या आईची तक्रार मुंबई पोलिसांना मेल केली. त्यासोबत सलमान शेख आणि रीनाचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले.
  - सोमवारी रात्री 9 वाजता मुंबई पोलिस सहारा विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी युवक-युवतीला अटक केले. पोलिसांना पाहून सलमान आणि रीना दोघांनाही धक्का बसला.
  - ते मुंबईहून कोलकाता मार्गे दुबईला जाण्याच्या तयारीत होते.
  - रीनाच्या आई-वडीलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी सलमानवर मुलीचे अपहरण करुन दुबईला घेऊन जाण्याचा आरोप केला आहे.
  - दोघांना वापी पोलिस स्टेशनला आणल्यानंतर भानूशाली समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केला.

  कुठे झाली होती दोघांची भेट
  पोलिस स्टेशनमध्ये सलमानने 'भास्कर'ला सांगितले की वापी येथे कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना एका गर्लफ्रेंडच्या माध्यमातून रीनासोबत ओळख झाली होती. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
  - सलमानकडे जो पासपोर्ट सापडला त्यानुसार त्याने आतापर्यंत 13 वेळा विदेश वाऱ्या केल्या आहेत.
  - पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यात त्याने सांगितले की बिझनेससाठी त्याने विदेश वाऱ्या केल्या. त्याचा काय बिझनेस आहे हे सांगताना मात्र तो अडखळला. त्याबद्दल त्याने पोलिसांना काहीही स्पष्ट सांगितले नाही.

  सव्वा कोटी रुपये आणि दागिने घेऊन गेली मुलगी
  - मुंबई विमानतळावर रीना आणि सलमानला अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या तीन सुटकेस जप्त करण्यात आल्या होत्या.
  - वापी पोलिस स्टेशनबाहेर जमलेल्या भानूशाली समाजाच्या जमावामध्ये चर्चा होती की युवती तिच्या घरातून सव्वा कोटी रुपये आणि 50 तोळे सोने घेऊन पळून गेली होती.

  सहा महिन्यांपूर्वी 3 लाख रुपये घेऊन रीनाला सोडले होते
  - अशी माहिती आहे की सहा महिन्यांपूर्वी रीनाला घेऊन सलमान फरार झाला होता. तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. रीनाच्या लग्नाआधी सलमानने तिची कथित व्हिडिओ क्लिप तयार करुन तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. सलमान रीनाला घेऊन सूरतमधील एका मशिदीत गेला होता. तिथे एका मौलवीच्या उपस्थितीत त्याने रीनाच्या कुटुंबियांकडून तीन लाख रुपये घेऊन तिला सोडले होते.

  पुढील स्लाइडवर पाहा, वापी पोलिस स्टेशनबाहेर समाजाचा जमाव...

 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign
  वापी पोलिस स्टेशन येथे सोमवारी रात्री गोंधळ उडाला होता.
 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign
  वापी, दीव-दमन , वलसाड येथून कच्छी भानूशाली समाजाचे लोक जमा झाले होते.
 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign
  युवक - युवती दुबईल पळून जाण्याच्या तयारी असल्याची चर्चा होती.
 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign
  मुंबई विमानतळावरुन दोघांना वापीला आणण्यात आले.
 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign
  दोघांकडून तीन सुटकेस जप्त करण्यात आल्या.
 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign
  कच्छी भानूशाली समाजाच्या लोकांनी वापी पोलिस स्टेशनबाहेर गर्दी केली होती.
 • Vapi Younger Caught With Married Woman Before Run Away Foreign
  सलमान शेखच्या मुंबईहून आलेल्या मित्रांना वापीमध्ये भानूशाली समाज्या लोकांनी बेदम मारहाण केली.

Trending