आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसयूव्ही-ट्रकच्या अपघातात तोगडिया बालंबाल बचावले; म्हणाले हा माझ्या हत्येचा कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- झेड प्लस सुरक्षा असलेले विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप)चे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या एसयूव्हीला बुधवारी एका ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. गुजरातमधील सुरतच्या कामरेज भागात झालेल्या या अपघातातून तोगडिया बालंबाल बचावले. गाडी बुलेटप्रूफ नसती तर माझा जीवही गेला असता, असे प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. या अपघाताच्या चौकशीची त्यांनी मागणी केली. तोगडिया यांनी अपघातानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गुजरात सरकारने जाणूनबुजून माझी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था कमकुवत केली आहे.  झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत त्यांच्या कारच्या पाठीमागे सतत पायलट व एस्कॉर्ट वाहन असते. एक रुग्णवाहिका कायम सोबत असते. बुधवारी सकाळी वडोदराहून सुरतला जाण्यासाठी निघालो तेव्हा एस्कॉर्ट व्हॅन देण्यात आली नव्हती. यासाठी गांधीनगरहून आदेश होते, असा आरोप त्यांनी केला. ट्रकने ज्या पद्धतीने धडक दिली आहे, ते पाहता सायरन वाजत असतानाही ट्रकचालकाने ब्रेक मारला नव्हता, हे संशयास्पद वाटते.  


यापूर्वी रहस्यमयरीत्या प्रवीण तोगडिया होते गायब  
तोगडिया म्हणाले, मला विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा प्रयत्न आहे. यासाठी असे हातकंडे वापरले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदाबादेत रहस्यमय पद्धतीने ते गायब झाले होते. त्यानंतर ते रुग्णालयात आढळले. तेव्हाही त्यांनी बनावट चकमकीत ठार मारण्याचा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त केला होता, हे विशेष.


केव्हा झाला अपघात
- प्रवीण तोगडिया कामरेजहून सूरतला जात होते. रस्त्यात एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघाताच्या वेळी ट्रकचा वेग जास्त होता.  
- तोगडिया यांनी सांगितले की, त्यांची कार बुलेटप्रूफ होती. कदाचित त्यामुळेच प्राण वाचले असतील असेही ते म्हणाले. दुसरी एखादी कार असती तर कदाचित मी बचावलोच नसतो, असेही ते म्हणाले. 


सोबत नव्हती सिक्युरिटी व्हेइकल
- तोगडियांनी दिलेल्या माहितीनुसार Z प्लस सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत कारच्या पुढे मागे सिक्युरिटीसाठी सुमारे 5 गाड्या असतात. पण आज एकच गाडी होती. 
- तोगडियांनी गुजरात सरकारवर आरोप केला की, गांधीनगरहून आदेश मिळाल्यानंतर माझी सिक्युरिटी कमी करण्यात आली. असे का केले? याची माहिती मला देण्यात आली नाही. 
- पोलिसांनी सांगितले की, ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...