आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : उपचारांच्या आडून डॉक्टरचे महिलांशी लैंगिक संबंध, 25 VIDEO व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. प्रतीक जोशी फरार आहे, त्याचे वडील म्हणाले, तो शहराबाहेर आहे. - Divya Marathi
डॉ. प्रतीक जोशी फरार आहे, त्याचे वडील म्हणाले, तो शहराबाहेर आहे.

बडोदा - शहरातील अनगड गावात स्वतःचे क्लिनिक चालवणाऱ्या एका डॉक्टरचे लेडी पेशंट्ससोबत फिजिकल रिलेशनचे 25 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हा डॉक्टर चांगले उपचार करतो असे सांगत महिलांचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर डॉक्टर फरार आहे. अशी माहिती आहे, की कोणीतरी डॉक्टरचे स्टिंग करुन त्याचे काळेकृत्य उजेडात आणले आहे. 

 

बीएचएमएस डॉक्टर असलेला प्रतीक जोशी 
- बडोदा शहरातील गोत्री रोडवरील कृष्णा टाऊनशिपमध्ये राहातो. येथून जवळच असलेल्या अनगड गावात त्याचा दवाखाना आहे. 
- डॉ. जोशी त्याचा क्लिनिकमध्ये येणाऱ्या गरीब महिलांचे चांगल्या उपचारांच्या नावाखाली शोषण करत होता.
- आतापर्यंतच्या माहितीनुसार डॉक्टरचे सहा महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. मात्र एकाही महिलेने डॉ. जोशी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही, त्यामुळे पोलिस या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नाही. 

 

माझा मुलगा बाहेर गेलेला आहे- डॉ. जोशीचे वडील 
- डॉ. प्रतीक जोशी फरार झाल्यानंतर dainikbhaskar.com ने त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली. डॉ. जोशीचे वडील म्हणाले, 'माझा मुलगा शहराबाहेर गेला आहे.' 

 

बातम्या आणखी आहेत...