आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले रुपाणी; जातीय समिकरणांसह 5 कारणांमुळे सोहळ्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भाजपच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मंगळवारी झाला. विजय रूपाणी (61) यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची तर नितिन पटेल यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पटेल-पाटीदार समाजातील 8 नेते मंत्री बनले. यावेळी दुपारी 12.39 ऐवजी सकाळी 11.30 वाजता शपथविधी झाला. एखाद्या राज्याच्या शपथविधीला प्रथमच 18 मुख्यमंत्री उपस्थित होते. कार्यक्रमात येण्यापूर्वी मोदींनी रोड शो देखिल केला. भाजपाध्यक्ष अमित शहांशिवाय अनेक केंद्रीय मंत्री, साधु-संत आणि 4 हजार व्हीव्हीआयपीही उपस्थित होते. 

 

किती मंत्र्यांनी शपथ घेतली.. 
सोहळ्यात मुख्यमंत्री रूपाणी (61) आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्यासह 20 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एक महिला मंत्री आहेत. रुपाणींशिवाय 19 मंत्र्यांपैकी 9 कॅबिनेट रँकचे आणि 10 राज्यमंत्री रँकचे आहेत. दक्षिण गुजरातमधून 5 आणि कच्छ-सौराष्ट्रमधील 7 मंत्री आहेत. पाच पटेल समाजाचे मंत्री आहेत. आनंदीबेन पटेलांना हटवल्यानंतर 2016 मध्ये रुपाणी सर्वात आदी मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात 25 मंत्री होते. त्यावेळी 9 मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.


नव्या मंत्रिमंडळातील कास्ट फॅक्टर.. 
1) पटेल-पाटीदार समाजाचे 8 मंत्री - रूपाणींच्या नव्या टीममध्ये पटेल-पाटीदार समाजाच्या 8 आमदारांना मंत्री बनवण्यात आले आहे. नितिन पटेल, आरसी फलदू, सौरभ पटेल, कौशिक पटेल, जयेश रादडिया, परबतभाई पटेल, ईश्वर सिंह पटेल आणि किशोर कनाणी हे 8 मंत्री आहेत. गुजरातमध्ये पटेल-पाटीदार मतदारांची संख्या 20% आहे. फलदू लेवा पटेल आणि सौरभ कडवा पटेल समाजाचे आहेत. तर पाटीदार नेते रादडिया  जेतपूर आणि दलित नेते ईश्वरभाई परमार बारडोलीतून निवडून आले आहेत. ईश्वर सिंह पटेल अंकलेश्वर आणि कनाणी सूरतच्या वराछामधून विजयी झाले आहेत. 

 

2) ओबीसीतील 5 मंत्री - ओबीसी समाजातून विजयी झालेल्या पाच आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दिलीप ठाकोर, बचुभाई खाबड, जयद्रथसिंह परमार, वासनभाई अहीर आणि पुरुषोत्तमभाई सोलंकी अशी नावे आहेत. 

 

3) राजपूत समाजाचे 2 मंत्री - भूपेंद्र सिंह चुडास्मा आणि प्रदीप जाडेजा राजपूत समाजातील नेते आहेत. त्यांना मंत्री बनवले आहे. 

 

4) दलित-आदिवासी समाजाचे 3 मंत्री - आदिवासी समाजातील असलेले गणपत भाई वासवा आणि रमणलाल पाटकर यांवा रूपाणींच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. तर दलित समाजातून मंत्री बनणारे एकमेव नेते आहेत, ईश्वरभाई परमार. 

 

5) सवर्ण समाजातील एकमेव महिला मंत्री - विभावरी दवे यांनाही रुपाणींच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. रूपाणी स्वतः जैन समाजाचे आहेत. रूपाणींच्या टीममध्ये त्यांच्याशिवाय अल्पसंख्याक समाजातील इतर कोणीही मंत्री नाही. 


शपथविधीतील वैशिष्ट्ये.. 
 

बातम्या आणखी आहेत...