आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भय्यू महाराजांच्या नेतृत्वातील संतनगरी होते मोदींचे स्वप्न Who Will Look Forward For Modi Dream Project Sant Nagari

भय्यूजींच्या अकाली जाण्याने मोदींच्या 575 कोटींच्या स्वप्नाचे काय होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> भय्यूजी महाराज यांच्या मार्गदर्शनात येथे संतनगरी होणार होती. 
> 540 एकर जमीनीवर 575 कोटींची संतनगरी उभी राहाणार होती. 

 

अहमदाबाद - आध्यात्मक गुरु आणि सामाजिक कार्यकर्ते भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथे राहात्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या अकाली निधनाने गुजरातमधील 575 कोटींच्या संतनगरीच्या स्वप्नाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे संतनगरी निर्माण करण्याचे मोदींचे स्वप्न आहे. या प्रकल्पाची जबाबदारी मोदींनी भय्यूजी महाराज यांच्याकडे दिली होती. 

 

4-5 महिन्यात पूर्ण होणार होती संतनगरी 
- भय्यू महाराज गेल्या महिन्यात गुजरातला आले होते. यावेळी त्यांनी सांगितले होते, की नव्या पिढीसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी 'संतनगरी' उभी करण्याचा प्लॅन तयार आहे. 
- नव्या पिढीसमोर संतांची शिकवण आधुनिक शैलीत सर्जनात्मक रुपात सादर करण्यावर विचार सुरु आहे. येत्या 4-5 वर्षांमध्ये या महत्त्वाकांक्षी संतनगरीचे काम पूर्ण होईल. 

 

संतनगरीला 540 एकर जमीन 
- साबरकांठा येथील वडाली तालुक्यातील महोर गावात 539.96 एकर सरकारी जमीनीवर संतनगरी उभी करण्याची योजना होती. तीन टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या संतनगरीसाठी 575.20 कोटी रुपये खर्च आपेक्षित होता. 
- नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. 

 

1370 संत-महापुरुषांचे देखावे 
- देशाच्या विविध भागातील आणि विविध धर्मांच्या 1370 संत आणि महापुरुषांचे देखावे या संतनगरीमध्ये उभे करण्याची योजना आहे. त्यासाठी संत-महापुरुषांची यादीही तयार आहे. 
- डोंगर, झरे, सरोवर गुहा, स्तूप, स्तंभ, शिल्प, मेडिटेशन सेंटर, नॉलेज सेंटर या संतनगरीमध्ये उभे केले जाणार आहे. 
- ही संतनगरी उभी राहिल्यानंतर राज्याचे पर्यटनही वाढेल अशी शक्यता व्यक्त केली गेली होती. 

 

पहिल्या टप्प्यात गौतम बुद्ध, गुरुगोविंद सिंग, संत कबीर यांचे देखावे 
- संतनगरीमध्ये अनेक संत-महापुरुषांचे देखावे उभे केले जाणार आहे. 
- तीन टप्प्यात तयार होणाऱ्या संतनगरीत पहिल्या टप्प्यात स्वामी दयानंद सरस्वती, भक्त कति नरसिंह महेता, मीराबाई, संत कबीर, संत तुलसी दास, सूरदास, गुरुगोविंद सिंग, भगवान गौतम बुद्ध, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई, महर्षि अरविंद यासारख्या 51 संत-महापुरुषांचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...