आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: ग्रंथदिंडीत बडोदेकरांचा अमाप उत्साह PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी, बडोदा- ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठलाचा अखंड नामघाेष, ढोलताशांचा गगनभेदी ध्वनी,  लेझीमचा ताल आणि मराठमोळ्या वेशात नटून सजून अालेले बडोदेकर मराठीजन अशा भारावलेल्या वातावरणात गुरुवारी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला बडाेद्यात प्रारंभ झाला. येथील लक्ष्मीविलास पॅलेसच्या प्रवेशद्वारी मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळे, नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग, भगवद््गीता या ग्रंथांसह राज्यघटनेचे पूजन करण्यात अाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या महागजरात दिंडीला प्रारंभ झाला. विविध शाळांचे विद्यार्थी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते. तर भजनी मंडळ, महिला मंडळ, वारकरी, चित्ररथांचा सहभाग यातून दिंडीला वेगळाच रंग चढला होता.

 

पुढील स्लाईडवर संमेलनाच्या प्रथम दिवसाचे फोटो

बातम्या आणखी आहेत...