आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन सानू छे भाई? सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सयाजीराव गायकवाड संमेलननगरी (बडाेदा)- ‘इये मराठीचीये नगरी’ असे जरी बडोदानगरीला म्हणत असले तरी या नगरीतील मराठीसह गुजराथी लाेक ‘आ संमेलन सानु छे’ अर्थातच ‘हे संमेलन काय आहे?’ असे प्रश्न विचारू लागले अाहेत. साहित्य संमेलनाला दहा हजार लोक रोज येतील अशा दावा आयोजकांकडून केला जात अाहे. मात्र  विद्यापीठात होत असलेल्या या संमेलनाबद्दल तेथील विद्यार्थ्यांनाच फारशी माहिती नसल्याचे दिसून अाले.   


९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बडोदा तेथे गुरुवारपासून सुरू झाले. मात्र संमेलननगरीत फारसा उत्साह नव्हता. संमेलनस्थळी श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यापीठात तब्बल ३५ हजार विद्यार्थी शिकतात. या विद्यापीठात सध्या यूथ फेस्टिव्हलची धूम सुरू आहे, ती २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या फेस्टमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकही गुंतले आहेत. यामुळे त्यांना या मराठी  साहित्य संमेलनाबद्दल काहीच कल्पना नाही. दुसरीकडे येथील स्थानिक माध्यमेही अनभिज्ञ आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी स्वतः आयोजकांना संपर्क साधून ‘आ संमेलन सानु छे? आ संमेलननी अमने जाणकार जुइये छे! ’( हे संमेलन काय आहे? आम्हाला याची माहिती हवी आहे) असे विचारले. त्यानंतर गुरुवारी खास हिंदी, गुजराती आणि इंग्रजी माध्यमांसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.    


फक्त ३०० प्रतिनिधींची नोंदणी  
संमेलनाच्या तारखा जाहीर होऊन साधारणपणे सहा महिने झाले असतील. तेव्हापासूनच संमेलनाची तयारी अपेक्षित होती. पण फक्त मांडव उभारणे, खुर्च्या टाकणे यापलीकडे तयारी सरकली नसल्याचे दिसून येते. या संमेलनासाठी फक्त ३०० लोकांनीच नोंदणी केल्याचे आयोजक दिलीप खोपकर यांनीच सांगितले. याशिवाय १५० निमंत्रितांची व्यवस्था करण्यात आली आहे. २५० विद्यार्थीही या संमेलनाला महाराष्ट्रातून येतील असेही खोपकर म्हणाले. या पार्श्वभूमीवर रोज या संमेलनाला १० हजार लोक येतील असा दावा त्यांनी केल्यानंतर मात्र उपस्थित पत्रकारांच्या भुवया उंचावल्या.  

 

 

आम्ही प्रयत्न केलाय  
आम्ही या संमेलनाला लोक यावेत म्हणून खूप प्रयत्न केले आहेत. गांधीनगरपासून गुजरातमधील महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास करून लोकांना आवाहन केले आहे. त्यामुळे संमेलन लाेकांपर्यंत पोहोचलेच नाही असे म्हणता येणार नाही. थोडे कमी पडलो असलाे तर त्याचा नक्कीच विचार करू.  
- दिलीप खोपकर, आयोजक, साहित्य संमेलन

 

बडोदेकरांपर्यंत संमेलन पोहोचलेच नाही

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बडोदा तेथे गुरुवारी (दि. 15) सुरुवात झाली.  संमेलन नगरीत मात्र कोणताही उत्साह नव्हता. संमेलन ज्या ठिकाणी सुरू आहे त्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड विद्यापीठात तब्बल 35000 विद्यार्थी शिकतात. या विद्यापीठात सध्या युथ फेस्टिव्हलची धूम सुरू आहे. हा फेस्टिव्हल 22 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या फेस्टमध्ये विद्यार्थी नाही तर शिक्षकही गुंतले आहेत. यामुळे त्यांना या संमेलनाबद्दल काहीच कल्पना नाही. दुसरीकडे येथील स्थानिक माध्यमेही या पासून अनभिज्ञ आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी स्वतः आयोजकांना संपर्क साधून आ संमेलन सानु छे? आ संमेलनी अमने जाणकार जुइये छे! ( हे संमेलन काय आहे? आम्हाला याची माहिती हवी आहे) असे सांगितल्यावर गुरुवारी खास हिंदी, गुजराती आणि इंग्रजी माध्यमांसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आयोजकांकडून बडोदेकरांपर्यंत संमेलन पोहोचलेच नसल्याचे सिद्ध झाले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...