आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासयाजीराव गायकवाड संमेलन नगरी, बडोदा- ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गुरुवारपासून सुरुवात झाली. या संमेलनाची स्थानिक माध्यमांना माहिती देण्यासाठी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलन आयोजनाचा विषय, भाषा, संस्कृती, संवर्धन, संस्थांवर तरुणांचे नसणे असे विषय घेत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी जोश दाखवला तर विविध प्रश्नांवर आता काय बोलावे अशी अवस्था आयोजक दिलीप खोपकरांची झाली होती.
या संमेलनाबद्दल खरे तर माहिती देण्यासाठी आणि ती माहिती पर्यायाने बडोदेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रपरिषदेचे आयोजन होते. या परिषदेला स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे गायकवाड उपस्थितच नव्हत्या. प्रतिनिधी म्हणून बडोद्याच्या मराठी वाङमय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर उपस्थित होते. पण, जोशींनीच जोशात सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला मराठी साहित्य महामंडळ काय, त्याची रचना कशी, मंडळावर कोण याचीच री त्यांनी ओढली. पुढे मग ही री भाषा कशा भाषांपासून वेगळ्या, आपण काहीच करत नाही, संमेलनं फक्त स्वल्पविराम इत्यादी इत्यादीपर्यंत ते ओढतच राहिले. तोपर्यंत खोपकर मात्र कोषात गेले. काय करावे उमजेना. त्यातही त्यांनी काही संमेलनाला येणाऱ्या लोकांची आकडेवारी दिली. मराठी, गुजराती समाज उपस्थित राहील, भाषा मीलन होईल, आम्ही प्रकाशक मेळावा घेणार आहोत असे बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मध्येच पुन्हा जोशी जोशात येत प्रकाशकांना लांब पडतं, परवडत नाही, पुस्तके छापणेच महाग झाले यावर येऊन घसरले. अखेर संमेलनाची तयारी यावर माहिती मिळालीच नाही. पत्रकारांनीच पत्रपरिषद आवरून घेतली.
‘त्यांना’ निमंत्रणे पाठवली
संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना निमंत्रणे पोहोचली नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर खोपकर म्हणाले की, सगळ्यांनाच निमंत्रणे पाठवली आहेत. कदाचित पोस्ट खात्याकडून पोहोचली नसतील. आपण मात्र दिली आहेत. रवींद्र गुर्जर यांना फोन गेला, व्हाॅट्सअॅप मेसेज गेला यावर ते म्हणाले की इतरांबाबतीत असे का झाले ते बघतो असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.