आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Businessman Shoots Wife And Two Daughters In Ahmadabad, व्यावसायिकाने पत्नीसह दोन मुलींची गोळ्या झाडून केली हत्या

गुजरात: कर्जबाजारी व्यावसायिकाने केली पत्नीसह दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- कर्जबाजारी झालेल्या व्यावसायिकाने मंगळवारी पहाटे आपल्या राहत्या घरी पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबात एका मुलीला उच्च शिक्षणासाठी विदेशी पाठवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि याच वादातून ही घटना घडली. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


सहाय्यक पोलिस आयुक्त एस. एन. जाला यांनी सांगितले की, व्यावसायिक असलेले धर्मेश शाह (50) यांनी जजेज बंगला परिसरातील ‘रतनाम टावर’मध्ये आपल्या लायसन्स असलेल्या पिस्तूलातून आधी पत्नीवर गोळी झाडली, यात तिचा मृत्यू झाला. यानंतर शाह यांनी हेली (24) आणि खुशी (18) या आपल्या दोन्ही मुलींची गोळ्या झाडून हत्या केली.

 

यानंतरत धर्मेश शाह यांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि आपल्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस आणि इतर लोक येईपर्यंत तो घटनास्थळीच बसून राहिले. धर्मेश शाह एक बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्यावर 15 कोटींचे कर्ज होते. कुटंबाला या कर्जाविषयी माहिती नव्हती.

बातम्या आणखी आहेत...