आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद (गुजरात) - 'व्हॅलेंटाइन डे'ला विरोध दर्शवतच्या शहरात 'लव्ह जिहाद' टायटलने पोस्टर लागले आहेत. या पोस्टरवर लिहिले आहे की 'हिंदू मुलींनो सावधान'. बजरंग दल आणि कर्णावती असेही पोस्टवर लिहिले आहे. मात्र या दोन्ही संघटनांकडून अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही.
काय आहे पोस्टरमध्ये
- बजरंग दलाकडून 'व्हॅलेंटाइन डे'ला दरवर्षी विरोध केला जातो. तो यंदाही कायम आहे. त्यासाठी बजरंग दल आणि कर्णावती यांच्यावतीने शहरात पोस्टर लावण्यात आले आहे.
- पोस्टरवर एका बाजूला मुलीचे चित्र आहे. तिचा अर्धा चेहरा बुरख्यात आहे तर दुसऱ्या बाजुला चेहरा दिसत आहे. तिच्या कपाळावर टिकली दिसत आहे.
- टिकली हे हिंदू महिलांच्या श्रृगांरातील महत्त्वाचा भाग आहे तर बुरखा हा मुस्लिम महिलांचे प्रतिक आहे.
- त्या फोटोखाली लिहिले आहे की हिंदू मुलींनो सावधान. बजरंग दल आणि कर्णावती. विशेष म्हणजे अहमदाबादला कर्णावती देखील म्हटले जाते.
क्लब आणि पबला वॉर्निंग
- अशी माहिती आहे की बजरंग दलाने शहरातील क्लब आणि पब मालकांना व्हॅलेंटाइन डे निमित्त विशेष प्रोग्राम न करण्याची वॉर्निंग दिली आहे.
- बजरंग दलाच्या वतीने शाळा आणि कॉलेज बाहेर व सार्वजनिक ठिकाणी हे पोस्टर ठळकपणे दिसतली अशा ठिकाणी लावण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.