आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काँग्रेस आवे छे’! गुजरात निवडणूक नव्या वळणावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यांपूर्वी मोदींचा ‘गुजरात गड’ अभेद्य समजला जात होता. ‘या वेळेस आम्ही १५० जागा जिंकू’ असे अमित शहा म्हणाले होते. त्या वेळी तसे वातावरण पण होते. लोकशाहीत जनतेला गृहीत धरावयाचे नसते. मे २०१४ मध्ये भाजपच्या सर्वंकष सत्तेनंतरही ‘आप’ ने दिल्लीत, ‘महागठबंधन’ ने बिहारमध्ये ‘भाजप’ ला तीव्र झटके दिले होते. आता ‘गुजरात’ मध्ये त्याची कमीअधिक पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ‘हुं छू विकास, हुं छू गुजरात’ अशी घोषणा देत रणांगणात उतरलेल्या ‘भाजप’ ला ‘काँग्रेस आवेे छे’ असे दमदार उत्तर दिले जात आहे. विकास वेडा झाल्याचे ठासून सांगितले जात आहे.  

 

 

राहुल गांधींचा आत्मविश्वास व बदलती प्रतिमा त्यामुळे मोदी-शहा जोडीने घेतलेला धसका जनतेला प्रथमच पाहावयास मिळत आहे. माध्यमांनीही मोदी स्तोत्र थांबवून राहुल गांधींची दखल घेतली आहे. खरे म्हणजे   ‘सीएम’ मोदींना ‘पीएम’ मोदी बनवण्यात माध्यमांचाच मोठा हात होता. चक्र उलटले आहे. ‘एबीपी माझा’ च्या निवडणू पूर्व सर्वेक्षणात ‘भाजप’ला ९१, तर काँग्रेस (मित्रपक्षांसह) ८० जागांचा अंदाज दिला आहे. ‘टाइम्स नाऊ’ ने भाजपला १०६-११६ तर काँग्रेसला ६३-७३ जागा सांगितल्या आहेत. यावरून भाजपविरोधी कल स्पष्ट होतो.  
 
गुजरातला प्रत्येक आंदोलनानंतर सत्ताबदलाची पृष्ठभूमी आहे. राज्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल असे कोणीही म्हणत नाही. पण हे वादळ आहे. वादळात काहीही होऊ शकते, असे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना वाटते. गुजरातच्या ‘विकास मॉडेल’ चा मोदींनी भरपूर डंका पिटला. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे मोदी सामान्य जनतेला भावले. लोकांनी भाजपला स्वप्नातही अपेक्षित नसलेली सर्वहारी सत्ता दिली. पण आता आपण  बनवलो गेलो असे जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. सामान्य जनतेला असा प्रश्न पडला आहे की, गुजरातमध्ये 
विकास केला आहे ना, मग एवढी प्रचंड धावपळ का?  शहा २ महिन्यांपासून गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आहेत. अवघे केंद्रीय मंत्रिमंडळ एक महिन्यापासून गुजरातमध्येच आहे. 
‘जीएसटी’ च्या कोट्यवधींनी सवलती जाहीर केल्या. या सवलती ७ महिन्यांनंतर जाहीर केल्या. आधी का नाही? पराभवाचा धसका म्हणून का? गुजरातेत भाजपने ऑक्टोबर २०१२ पासून ११००० कोटी रुपयांच्या खैराती योजना दिल्या. चांगली गोष्ट आहे ही. पण हे सारे आधीही योजनाबद्ध रीतीने करता आले असते ना?  
 
मग विकास केला नाही का? असे नाही. विकास जरूर झाला. पण तो मूठभर नवश्रीमंतांचा, फार तर वरिष्ठ मध्यम वर्गाचा. पराकोटीचा विषमताकेंद्रित विकास. बहुसंख्य सामान्य जनतेला लाभ नाही. प्रचंड बेरोजगारी. देशात रोजगाराचा दर ५% आहे. गुजरातमध्ये मात्र १ टक्क्यापेक्षा कमी आहे. (०.९ टक्के) मात्र सेवा उद्योग वाढलेत. सेवा उद्योगात अत्यल्प रोजगारी असते. 
 
कारखानदारी (मॅन्युफॅक्चरिंग) व शेती क्षेत्रात रोजगार मिळतो. शेतकऱ्यांवर गोळीबार होतो. याशिवाय पाटीदार आंदोलन, दलितांवरील अत्याचार, अल्पसंख्याकांबाबतचा दुजाभाव, नोटबंदी व जीएसटीचा असह्य त्रास  यामुळे गुजरात अस्वस्थ आहे. राहुल गांधी धार्मिक प्रश्न, घोषणा, वाद यापासून प्रयत्नपूर्वक लांब राहिले आहेत. देशातील असहिष्णू वातावरणाची, अघोषित आणीबाणीची गुजराती जनतेला जाणीव होऊ लागली आहे. 
 
या निवडणूक प्रचार मोहिमेत दोन उणिवा जाणवतात. खरे म्हणजे पंतप्रधान मोदी सदासावध व चतुर राजकारणी आहेत. यूपीए-२ ची शेवटची दोन वर्षे काँग्रेसने निष्क्रियतेने घालवली. परंतु मोदींनी जीएसटीचा होणारा त्रास लक्षात घेऊन ‘डॅमेज कंट्रोल’ ची पावले उचलली. ‘गुजरातचे प्रश्न’ हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा अपेक्षित होता. त्याऐवजी काँग्रेसचा भ्रष्टाचार, राहुल गांधी यांना ‘शहजादे’, ‘बाबर’ म्हणून हिणवणे एवढे दोनच मुद्दे भाजपला २ महिने पुरले. आपण चार वर्षांपासून हेच सांगत आहात. 
 
पण किती वर्षे? काँग्रेस वाईट होती म्हणून लोकांनी सत्तेबाहेर घालवली. एकंदरीत सारासार विचार करता तूर्त तरी ‘नवसर्जित’ राहुल गांधींचा उदय या गुजरात 
निवडणुकीचा परिपाक होय, असेच म्हटले तर वावगे ठरू नये. 
 
- प्रा. काशीनाथ दुसाने  
बातम्या आणखी आहेत...