आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Brutal:सहावीही मुलगीच! रागात बापाने भोसकले, चिमुरडीची किडनी-आतडे आले बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरातमध्ये हादरा देणारी अशी अत्यंत निर्घृण घटना समोर आली आहे. येथे मुलाच्या हव्यासापोटी बापाच्या रुपातील एका राक्षसाने चार दिवसांच्या चिमुरड्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. या चिमुरडीला धारदार चाकूने मारल्याने अक्षरशः तिची किडनी आणि आतडे बाहेर आले होते. विशेष म्हणजे मुलाच्या हव्यासापोटी या व्यक्तीने पाच मुलींना जन्म दिला. सहाव्याही वेळी मुलगीच झाल्याने त्याने या चिमुरडीवर असा राग काढला. या नराधमाचे नाव आहे विष्णू राठोड. 


गुजरातच्या गांधीनगरमधील मोती मसांग गावात विष्णू आणि त्याची पत्नी विमला राहतात. विष्णू आणि विमला यांचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना एका पाठोपाठ पाच मुली झाल्या. आपल्याला मुलगा व्हावा अशी विष्णूची प्रचंड इच्छा होती. पण त्याला पाचही मुली झाल्या. पण त्याला मुलगा हवाच होता. त्यामुळे त्याने आणखी एका बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्याची पत्नी विमला सहाव्यांदा गर्भवती राहिली. पण यावेळीही तिला मुलगीच झाली. 


विमला बाळांतपणासाठी माहेरी गेलेली होती. सहाव्या वेळीही मुलगीच झाल्याने तिचा पती विष्णू प्रचंड चिडलेला होता. तो चौथ्या दिवशी बाळाला आणि पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेला. त्याठिकाणी गेल्यावर त्या नवजात मुलीला पाहताच त्याला राग अनावर झाला. त्याच प्रचंड संतापात त्याने चिमुरडीची हत्या केली. धारदार चाकूनेच त्याने तिला भोसकले. हा प्रकार केला तेव्हा विष्णूची पत्नी विमला झोपलेली होती. बाळाचा रडण्याचा आवाज ऐकूण ती उठली. तोपर्यंत विष्णूने त्या चिमुरडीवर वार केला होता. या प्रकारानंतर विष्णूने पळून जाण्याचा प्रयत्नही केला. पण सासरच्या लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. विष्णूच्या सासऱ्यांनी पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...