आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 जानेवारीला भंसाळीला घरात घुसून मारू, गुजरातमधील नाराज राजपुतांची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - पद्मावती चित्रपटाच्या मुद्द्यावरून राजकोटमध्ये करणी सेनेने गॅलेक्सी सिनेमासमोर विरोध व्यक्त केला. त्यात करणी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी चित्रपट आणि संजय लीला भंसाळींच्या विरोधात घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे तर 12 जानेवारीलाकरणी सेनेचे कार्यकर्ते भंसाळींच्या घरात घुसून त्यांना मारतील अशी धमकीही देण्यात आली आहे. 


काय म्हटले करणी सेनेने 
गुजरात करणी सेनेचे उपाध्यक्ष जोगेंद्र सिंह चंपावते यांनी सांगितले की, 12 जानेवारीला आम्ही मुंबईला जात आहोत. 12 जानेवारीला आम्ही त्याठिकाणी भंसाळीच्या घरात घुसून त्याला मारू. पद्मावती केवळ राजपुतांची नव्हे तर समस्त हिंदुंची माता होती. ज्याप्रमाणे राजस्थानात चित्रपटावर बंदी लावण्यात आली आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण देशात या चित्रपटावर बंदी आणायला हवी. आम्ही सर्व चित्रपटगृहांच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. तसेच घुमर गाणे कोणत्याही रेडिओवर वाजू नये, यासाठी सर्व रेडिओ स्टेशनलाही विनंतीचे पत्र लिहिले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...