आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी घेतले गुजरातच्या 26 व्या मंदिराचे दर्शन, बाहेर येताच लागल्या मोदींच्या घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी रविवारी गुजरातच्या 26 व्या मंदिरात पोहोचले. त्यांनी खेडा येथील डकोरच्या श्री रणछोड़जी मंदिराचे दर्शन घेतले. पूजा करून ते बाहेर निघाले तेव्हा शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांनी अभिवादन करताना हात दाखवला. त्याचवेळी काहींनी मोदी-मोदी अशा घोषणाबाजी सुरू केल्या. यानंतर ते कारमध्ये बसले आणि त्यांचा ताफा निघून गेला. तत्पूर्वी शुक्रवारी राहुल गांधींनी अहमदाबादच्या मोगलधान-बावला मंदिराचे दर्शन घेतले होते.

 

- उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या 2 महिन्यांपासून ते गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यात शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले.
- दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहेत. तसेच याचा निकाल 18 तारखेला जाहीर केला जाणार आहे. 
- यापूर्वी त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी राहुल यांनी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतले होते. त्याचवेळी त्यांचे नाव रेजिस्टरवर बिगर हिंदू असे नोंदवण्यात आले होते. त्यावरून मोठा वाद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...