आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाला किडनी डोनेट करण्यासाठी धाकट्याची आत्महत्या, तरी झाले नाही ट्रान्सप्लान्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा (गुजरात) - येथील इंजिनीअरींगच्या एखा विद्यार्थ्याने मोठ्या भावाचे प्रकाण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. 19 वर्षांचा नैतिक तंदेलला त्याच्या आजारी भावाला किडनी डोनेट करायची होती. त्यासाठी त्याने शनिवारी फाशी घेऊन आत्महत्या केली.  पण त्याचे बलिदान कामी आले नाही. मृतदेहाचे विघटन झाल्याने त्याचे ट्रान्सप्लान्ट करता आले नाही. 

 

सुसाइड नोट सापडली 
- पोलिसांना खोलीतून एक सुसाइड नोटही आढळली आहे. त्यात मृत नैतिक मोठा भाऊ कनिषला किडनी डोनेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 
- नैतिकने सुसाइड नोटमध्ये लिहिले, मोठ्या भावाला किडनी डोनेट करायची आहे. त्यासाठी मी स्वखुशीने आत्महत्या करतोय. त्यात कोणाचाही संबंध नाही. तसेच कोणाचीही चौकशीही करू नये. 
- किडनी मोठ्या भावाला दिल्यानंतर इतर अवयव इतर गरजुंना द्यावे असेही त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. नैतिक वलसाडच्या पारदीचा राहणारा होता. 


मोठ्या भावाच्या वेदना पाहावल्या नाहीत 
नैतिकचा मोठा भाऊ अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडनी फेल झाल्याने तो डायलिसिसवर आहे. त्याच्या वेदना नैतिकला सहन झाल्या नाही. त्यामुळे त्याने भावाला किडनी मिळावी म्हणून थेट फाशी लावून घेतली. डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लान्ट करण्याचा प्रयत्न केला पण मृतदेहाचे विघटन झाल्याने ते शक्य झाले नाही. 

बातम्या आणखी आहेत...