आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरेंद्रनगर (गुजरात) - येथील सुरेंद्रनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी एक 6 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याची सावत्र आई मुलगा सापडत नसल्याने सैरावैरा धावत, आरडाओरड करत होती. वडिलांनी मुलाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतू मुलगा कुठेही दिसत नव्हता. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा जिन्याखाली ठेवलेल्या सुटकसमध्ये 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह निपचीत पडलेला सापडला. मुलाच्या हत्येचा आरोपात त्याच्या सावत्रआईला अटक करण्यात आली आहे.
महिलेने असा रचला होता डाव
सुरेंद्र नगर येथील कृष्णनगरमध्ये राहाणारे शांतिलाल यांचा 6 वर्षांचा मुलगा ध्रुव मंगळवारी सायंकाळी अचानक गायब झाला होता. मुलगा कुठेच दिसत नसल्याने सावत्रआई जीनलबेन परमार आरडाओरड करायला लागली. 2 तास मुलाची शोधाशोध सुरु होती.
मुलगा सापडत नसल्याने हतबल शांतिलाल परमार यांनी मुलगा हरवल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दिली.
चौकशीसाठी पोलिस घरी आले. घराच्या पायऱ्यांखाली त्यांना दोन सुटकेस दिसल्या. पोलिसांनी त्याबद्दल जीनलबेनकडे विचारणा केली तर तिने टोलवा-टोलवी केली.
पोलिसांनी कडक शब्दात विचारणा केल्यावर त्या सुटकेस उघडण्यात आल्या. एका सुटकेसमध्ये ओढणीमध्ये गुंडाळलेले मुलाचे कलेवर होते.
पोलिसांचा चौकशीचा रोख आता जीनलबेनकडे गेला होता. सुरुवातीला तिने काहीही स्पष्ट सांगितले नाही, मात्र जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा बोलायला सुरुवात केली.
बाळ होऊ न देण्याच्या अटीवर केले लग्न
- कामगार आयुक्तालायत क्लर्क असलेल्या शांतिलाल परमार यांचे वर्षभरापूर्वी जीनलबेनसोबत लग्न झाले होते. त्यांचे हे दुसरे लग्न होते. शांतिलाल यांना आधीच्या पत्नीपासून 6 वर्षांचा ध्रुव हा मुलगा होता तर जीनलबेनला पहिल्या पतीपासून 6 वर्षांची मुलगी होती. दोघांनीही तिसरे बाळ होऊ देणार नाही या अटीवरच लग्न केले होते.
मुलीच्या चिंतेने केली सावत्र मुलाची हत्या
दुसऱ्या लग्नानंतर जीनलबेनला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीच्या भविष्याची चिंता सतावत होती. तिला भीती होती की शांतिलाल त्याची सर्व संपत्ती त्याचा मुलगा ध्रुव याला देईल मग मुलीचे काय होणार?
मुलीच्या चिंतेने ग्रस्त जीनलबेन हिने मंगळवारी दुपारी तिचा सावत्र मुलगा ध्रुव याची पँट उतरवली आणि त्याच पँटने त्याचा गळा आवळला.
आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि सर्वांना संभ्रमात टाकण्यासाठी तिने मुलगा हरवल्याची आवई उठवली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डॉगस्कॉडसह पोहोचले होते पोलिस...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.