आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये पुराचा कहर दाखवणारा Video, 29 हून अधिक जण ठार, पुढचे 2-3 दिवस अलर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/अहमदाबाद - जोरदार पावसाने गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये कहर केला आहे. हवामान विभागाने आगामी 2-3 दिवसांपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे. दुसरीकडे बुधवारी विदर्भ, मध्य प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे गोवा, किनारी कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, असाम येथेही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


देशात मान्सूनने पुन्हा जोर पकडला आहे. मान्सून गुजरात, मध्य भारत आणि दक्षिणेतील राज्यांत सक्रिय आहे. हवामान विभागाचे संचालक के जी रमेश यांच्या मते मंगळवारी हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला. सुमारे 15 ठिकाणी 100 ते 300 मिमी पाऊस झाला. गुजरातमध्ये विशेषतः सौराष्ट्राच्या भागात पावसाने कहर केला आङे. सात पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 4 हजार लोकांना सोडवण्यात आले आहे. दुसरीकडे अद्याप मान्सून सगळीकडे पसरलेला नाही. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हरियाणा आणि ईशान्येकडे पावसाने पाठ फिरवली आहे. 

- गुजरातमध्ये सौराष्ट्र-कच्छमध्ये सर्वाधिक 448% जास्त पाऊस झाला. एका दिवसात महिन्याच्या 30 टक्के पाऊस झाला आतापर्यंत 29 जणांनी प्राण गमावले आहे. 
- देशभरात 15 ठिकाणी 100-270 मिमीपर्यंत पाऊस झाला आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


मंगळवारपर्यंत कुठे किती पाऊस 

महाबळेश्वर(महाराष्ट्र) - 270 मिमी
दीव दमन (दीव) - 263 मिमी
वलसाड (गुजरात) - 223 मिमी
राजकोट (गुजरात) - 189 मिमी
वेरावल (गुजरात) - 183 मिमी
डिब्रूगड (आसाम) - 123 मिमी
महुवा (गुजरात) - 121 मिमी
होशंगाबाद (मध्यप्रदेश) - 116 मिमी

बातम्या आणखी आहेत...