आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील कौशल्याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी अग्रवाल दांंपत्याने तयार केली ६६९० हिरे मढवलेली लोटस रिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोटसच्या आकाराची अंगठी - Divya Marathi
लोटसच्या आकाराची अंगठी

सुरत- हिऱ्याची नगरी अशी ओळख असलेल्या सुरतमध्ये अंगठी निर्मात्यांनी २५ कोटींची लोटस रिंग तयार केली आहे. या रिंगला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड््समध्ये स्थान मिळाले आहे. या अंगठीने जयपूरचा विक्रम मोडला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अंगठीला ६६९० हिरे मढवले आहेत, तर १८ कॅरेट रोझ गोल्डचा वापर करण्यात आला आहे. अग्रवाल दांपत्य यावर गेल्या एक महिन्यापासून काम करत होते. सोन्याच्या दागिन्यांच्या निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि मेक इन इंडियाला चालना मिळावी यासाठी भारतीय थीमचा वापर करण्यात आला आहे. 


मेक इन इंडियाला ओळख देण्यासाठी तयार केली रिंग 
अंगठीबाबत विशाल अग्रवाल यांनी सांगितले, अशा प्रकारची अंगठी तयार होऊ शकते, याची आम्हालाही कल्पना नव्हती. अमेरिकेत युनिक आणि आऊट ऑफ द बॉक्स दागिने पाहिले. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचे डिझाइनही असावे, असा विचार मनात आला. त्यानंतर खुशबू आणि मी एक वर्ष संशोधन केले. भारताची ओळख दिसावी, अशी लोटस रिंग तयार करण्याचे आम्ही ठरवले. १ जून रोजी अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे ती सादर केली. 


सेव्हिओचा विक्रम मोडला 
सर्वाधिक हिरे जडलेली अंगठी असा विक्रम आजवर राजस्थानच्या सेव्हिओ नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदला गेलेला होता. आकाराने ती मोठी असल्याने बोटात घालणे शक्य नव्हते. ३८०० हिरे व मोराच्या आकाराची ती अंगठी होती. जयपूरच्या सेव्हिओ या व्यक्तीने ती तयार केलेली होती. 


मुंबईची मदत घेतली 
लोटस रिंग तयार करण्यासाठी अग्रवाल दांपत्याने सुरतबरोबरच मुंबईतील कारागिरांचे साह्य घेतले. कारण काही उपकरणे सुरतमध्ये नव्हती. संगणकावर याचे मॉडेल तयार करण्यात आले. डिझाइन अंतिम झाल्यानंतर आकार देण्याचे काम सुरू झाले. 

बातम्या आणखी आहेत...