आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन पुतळे रात्रीतून गायब, संतप्त दलित समाज रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन पुतळे हटवल्यानंतर संतप्त दलित समाज रस्त्यावर उतरला. - Divya Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन पुतळे हटवल्यानंतर संतप्त दलित समाज रस्त्यावर उतरला.

राजकोट - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान जेवढा आम्ही केला, तेवढा कोणीच केला नाही. असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात- गुजरातमधून एका रात्रीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन पुतळे गायब झाले आहे. यामुळे संतप्त झालेला दलित समाज रस्त्यावर उतरला. नागरिकांनी रस्त्यावर गोळा होत चक्काजाम आंदोलन केले. महिलाही मोठ्या संख्येने रस्यावर उतरल्या. सर्वांनी भाजपा आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी हाय-हायच्या घोषणा दिल्या आहेत. 


मनपाने हटवले पुतळे 
- राजकोटमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल महानगर पालिकेचे म्हणणे आहे, की डॉ. आंबेडकरांचे दोन्ही पुतळे विनापरवानगी बसवण्यात आले होते. 
- राजकोटमधील राजनगर आणि आस्था चौकात डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आला होता. 
- हे दोन्ही पुतळे महापालिकेने रात्रीतून काढले आणि सुरक्षित स्थळी हलवले. 
- मनपा प्रशासनाने रात्री दीड वाजता अधिकाऱ्यांना बालोवले. सर्वांचे मोबाइल जप्त करण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या करण्यात आल्या, दोन्ही तुकड्यांसोबत फायरब्रिगेडचे काही अधिकारी देण्यात आले. अशा प्रकारे सर्व साधनांनी सज्ज रात्रीच्या अंधारात शांततेत दोन्ही पुतळे हटवण्यात आले. 

 

नागरिकांमध्ये रोष 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जंयती होऊन अजून आठ दिवस झाले नाही तर त्यांचे दोन चौकात स्थापित करण्यात आलेले पुतळे काढल्याने राजकोटमधील नागरिकांमध्ये रोष आहे. 
- शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शांततापूर्ण विरोध व्यक्त केला. नागरिकांनी मनपा प्रशासनाला बाबासाहेबांचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी उभा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 5 पर्यंतची वेळ दिली आहे. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 
- शुक्रवारी सकाळी नागरिकांनी बीआरटीएस येथे रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि मनपा अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर लोकांनी आंदोलन मागे घेतले.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गायब झालेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा... 

बातम्या आणखी आहेत...