आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संभोगापासून समाधीपर्यंत' : ड्रग्ज, सेक्स, ओशो अन् गुजराती शीलाची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका लहानशा गावात जन्‍माला आलेला मुलगा जगभरात नावलौकिक करतो, अशा ओशाेंचा 11 डिसेंबर हा जन्‍मदिवस. त्‍यानिमित्‍त divyamarathi.com च्‍या या विशेष स्टोरीतून दुर्मिळ फोटोंसह जाणून घ्‍या ओशो यांच्‍या जन्‍मापासून ते मृत्‍यूपर्यंतच्‍या सर्व प्रमुख घटना.

> 19 जानेवारी 1990 रोजी ओशोंचा पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमात मृत्यू झाला. आज सव्वीस वर्षांनंतर अचानक ओशोंची चर्चा हाेण्याचे कारण म्हणजे, त्यांच्या मृत्युपत्राचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. ओशोंचे एकेकाळचे शिष्य असलेल्या योगेश ठक्कर यांनी ओशोंच्या गूढ मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करत ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या सध्याच्या सहा विश्वस्तांवर संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय ओशोंच्यासर्वांत प्रिय आणि विश्वासपात्र पीए मां आनंद शीला यांनी आश्रमाबाबत सांगितलेली माहिती....
>ओशो या नावाने लोकप्रिय झालेले चंद्रमोहन जैन ऊर्फ आचार्य ओशो रजनीश यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील कुचवाडा या गावी झाला. त्यांचे वडील कपड्याचे व्यापारी होते. एकूण ते 11 भावंडे होते. त्यांचे निधन 19 जानेवारी 1990 रोजी पुण्यातील आश्रमात झाले. यावेळी ते 59 वर्षांचे होते.
> पश्चिमेकडील देशांमध्ये आध्यात्माचा व्यापार करणारे रजनीश उर्फ ओशो यांना ड्रग्ज आणि सेक्सचे व्यसन होते. हा खुलासा त्यांची सर्वांत प्रिय आणि विश्वासपात्र पीए मां आनंद शीला यांनी केला आहे. शीला बडोदा येथील भाईली गावच्या असून सध्या स्वित्झर्लंड येथे राहतात.

> ओशो आश्रमात 55 मिलियन डॉलरचा घोटाळा केल्याप्रकरणी शीला यांना 39 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर 20 वर्षांनी शीला यांनी ‘डोंट किल हिम! ए मेम्वर बाई मा आनंद शीला’ या पुस्तकात ओशो आश्रम आणि त्यासंदर्भात अनेक रहस्यांवरुन पडदा उघडला.

> शीला यांनी पुस्तकात अनेक ठिकाणी ओशोंना धन आणि भौतिक सुख-सुविधांचे आकर्षण असल्याचा उल्लेख केला आहे. दुसरीकडे ओशोंचे समर्थक म्हणतात, की पुस्तकाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी असे लिखाण केले आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, शीला यांच्या पुस्तकातील काही मजकूर... जो ठरलाय वादग्रस्त....

बातम्या आणखी आहेत...